Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड दिवाळी तोंडावर अन् उर्मिला मातोंडकर कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर दिली माहिती

दिवाळी तोंडावर अन् उर्मिला मातोंडकर कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर दिली माहिती

भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. दुसऱ्या लाटेनंतर स्थिती पूर्ववत होत आहे. तसेच लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात कमी झाला आहे. चित्रपटसृष्टीवर देखील याचा खूप परिणाम झाला. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच अशी बातमी समोर आली आहे की, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दिवाळी नुकतीच तोंडावर आली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षण जाणवताच तिने टेस्ट केली असल्यास, तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या नंतर तिने स्वतःला क्वारंटाईन केले आहे.

उर्मिलाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे की, “मी कोरोना टेस्ट केली आहे. माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.” तिने पुढे लिहिले की, “माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विनंती करते की, त्यांनी लगेच टेस्ट करून घावी. यासोबत सगळ्यांना विनंती आहे की, दिवाळीच्या सणात सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.” (actress urmila matonadkar’s corona test positive, give information on social media)

उर्मिलाच्या आधी अभिनेत्री निशा रावलने देखील तिची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी दिली होती. तसेच तिने सोशल मीडियावर सगळ्यांना सांगितले होते की, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. तसेच तिने कोरोना नियमांचे पालन करून मास्क वापरण्याची विनंती केली होती.

उर्मिला मातोंडकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. समाजातील अनेक मुद्दे आणि प्रसंग यावर ती तिचे मत व्यक्त करताना नेहमीच दिसत असते. तिने बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास खूप मेहनतीने आणि चिकाटीने केला आहे. ‘नरसिम्हा’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘रंगीला’, ‘चमत्कार’, ‘बेदर्दी’ या चित्रपटात काम केले. उर्मिलाने हिंदी चित्रपटासोबतच मल्याळम, तेलगू आणि मराठी चित्रपटामधून देखील आपले काम कमावले आहे. तिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. ती शिवसेना या राजकीय पक्षात सामील झाली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाच्या ४३ व्या वर्षी काश्मीरी बिझनेसमॅन आणि मॉडेल मोहसीन अख्तरसोबत लग्न केले. तिचा पती तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. त्या दोघांचे लग्न अगदी थाटामाटात झाले होते. लग्नात अनेक लोक सहभागी झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा