Thursday, January 22, 2026
Home मराठी ‘आयुष्यात कधी वाटलचं नव्हतं…, म्हणत उर्मिला निंबाळकरने केले बाळासोबत सुंदर फोटो शेअर

‘आयुष्यात कधी वाटलचं नव्हतं…, म्हणत उर्मिला निंबाळकरने केले बाळासोबत सुंदर फोटो शेअर

या वर्षी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आई-बाबा झाले आहेत. यातीलच मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही देखील आई झाली आहे. तिने या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना दिली होती. अशातच तिने तिच्या मुलासोबत काही गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मुलासोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती घरच्या साध्या कपड्यात दिसत आहे. तसेच बाळाची देखील नुकतीच अंघोळ झालेली दिसत आहे. तिने तिच्या बाळाला उचलून घेतले आहे. फोटोमध्ये आई आणि बाळ दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. (Actress urmila Nimbalkar share a photo with her son on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आयुष्यात कधी वाटलेच नव्हतं की, सर्वात कष्टाचा, सर्वात जास्त शिकवणारा, सर्वात कळकट्ट, सर्वात जास्त पोटाचा घेर असलेला आयुष्याचा काळ माझा सर्वात आनंदी काळ असेल.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. अनेकजण तिच्या बाळाचे कौतुक करत आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “ससा तुमच्यासारखाच दिसतोय.” तसेच आणखी एका चाहत्याने “आई आणि बाळ दोघेही गोड दिसताय,”अशी कमेंट केली आहे. तिचा हा फोटो मोठ्या संख्येने लाईक केला जात आहे. या आधी देखील तिने तिच्या बाळासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

उर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘दुहेरी’, ‘एक तारा’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. तसेच तिने डोहाळ जेवणाचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा