छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या अनेक अभिनेत्री या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एकदम बोल्ड असतात. त्या मालिकेत जरी सोज्वळ आणि संस्कारी सूनेची भूमिका साकारत असल्या, तरीही त्या त्यांचे वैयक्तिक आयुष्या त्यांच्या मर्जीप्रमाणेच जगतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी वयाची चाळिशी पार करूनही हॉटनेसचा तडका लावत आहे. ती अभिनेत्री इतर कुणी नसून उर्वशी ढोलकिया आहे. उर्वशी ही ४३ वर्षांची असून तिला २ मुलेही आहेत. मात्र, तिच्या फिटनेसवरून तिच्या वयाचा अंदाज लावणे जरा कठीणच आहे. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने बिकिनीतील फोटो शेअर करत सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
निर्माती एकता कपूर हिच्या ‘नागिन ६’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholkia) हिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये ती शानदार पोझही देत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची जोरदार पसंती मिळत आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत जवळपास २० हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच, तीनशेहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
View this post on Instagram
एकाने कमेंट करत लिहिले की, “बर्फाच्या पाण्यात फायर लावतो मी.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “पाण्यातच आग लावून टाकली.” विशेष म्हणजे, कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि अभिनेता विशाल सिंग यांनी फायर इमोजी कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
इतर अभिनेत्रींनाही टक्कर देतेय उर्वशी
सोशल मीडियावर तुफान सक्रिय असणारी उर्वशी तिच्या अदांनी चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. ती तिच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींनाही सौंदर्याच्या बाबतीत काट्याची टक्कर देताना दिसते. ती सर्वच फोटोंमध्ये सुंदर दिसते. अभिनेत्री इतर महिलांसाठीही प्रेरणा आहे. तिने या वयातही स्वत:च्या फिटनेसची काळजी घेत आहे.
उर्वशीने सन २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी सौतन कभी सहेली’मधूनही ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने ‘कोमोलिका’ या भूमिकेतून सर्वत्र आपली छाप सोडली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याच्या बातम्यांवर संतापली करीना; म्हणाली, ‘मी काय यंत्र…’
प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये बिपाशाच्या लेटेस्ट पोस्टवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटोमध्ये काय आहे खास?
सलमान खानच्या जीवाला धोका? गन लायसन आणि आता बुलेटप्रूफ गाडीची व्यवस्था










