Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा नवा विक्रम, पारंपरिक लूक करत पायापर्यंत लांब वेणी घालून लावले त्यावर सुंदर गाजरे

बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो इंटरनेटवर येताच काही मिनिटांत व्हायरल होतात. उर्वशी प्रत्येक वेळी तिची स्टायलिश फॅशन वेगळी आणि अनोखी ठेवते. तिच्या प्रत्येक लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. तिचा वेस्टर्न लूक जितका झकास आहे, तितकाच तिचा पारंपारिक लूकही अप्रतिम आहे. आता तिने नवा विक्रम केला आहे. उर्वशीने सर्वात लांब आणि घनदाट वेणी घालून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या इंडियन लूक हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री तिच्या मैत्रिणीच्या लग्नात पोहोचली होती, जी पाहून सगळेच थक्क झाले. तिने ज्यापद्धतीने आणि सौंदर्याने तिची पोनीटेल फ्लॉन्ट केली आहे, ज्याने सर्वांना प्रभावित केले आहे.

चमकदार चंदेरी रंगाच्या साडीत तिच्या पायाला स्पर्श करणारी तिची वेणी तिला खूप छान दिसत आहे. तिने डोक्यापासून पायापर्यंत केसांना गजराही लावला आहे. हातात मॅचिंग बांगड्या आणि कपाळावरची टिकली उर्वशीच्या लूकमध्ये भर घालत होती. तिने तिच्या वेणीवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. उर्वशीच्या चाहत्यांनी तिला या पोस्ट्सवर भरभरून दाद दिली आहे.

उर्वशीने मैत्रिणीच्या लग्नाला लावली हजेरी 

या इंडियन क्लासिक लूकमध्ये उर्वशी तिच्या शाळेतील बेस्ट फ्रेंडच्या लग्नात पोहोचली होती. अभिनेत्रीच्या उपस्थितीमुळे तिची मैत्रीण खूप खूश होती. उर्वशीचे कौतुक करताना ती म्हणाली की, “उर्वशीने मोठी ओळख मिळवली असेल पण ती आजही आमच्यासाठी बदललेली नाही. ती जशी होती तशीच आहे. आजही आम्ही भेटतो तेव्हा ती मनमोकळेपणाने हसते. तिने ही मैत्री जपली आहे.”

दुबई फॅशन वीकमध्ये परिधान केला होता करोडोचा गाऊन

काही काळापूर्वी उर्वशी दुबई फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी उर्वशी ही पहिली भारतीय आहे. जिला या प्रतिष्ठित रॅम्पवर चालण्याची दुसरी संधी मिळाली आहे. ती शोस्टॉपर होती. या फॅशन वीकमध्ये उर्वशीने करोडो रुपयांचा गोल्डन गाऊन परिधान केला होता, जो खूप चर्चेत होता.

हेही वाचा

हे देखील वाचा