Monday, July 1, 2024

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने साडी नेसून ‘कजरा रे’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, अभिनेत्री ऐश्वर्या रायलाही दिली टक्कर

बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चात्यांबरोबर शेअर करत असते. तिचे फोटो इंटरनेटवर येताच काही मिनिटांत व्हायरल होतात. तिच्या प्रत्येक लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. तिचा वेस्टर्न लूक जितका झकास आहे, तितकाच तिचा पारंपारिक लूकही अप्रतिम आहे. या एपिसोडमध्ये उर्वशीने आता चाहत्यांसाठी साडीतील लूक ट्राय केला आहे आणि इतकंच नाही, तर ती ऐश्वर्या रायच्या गाण्यावर तिचा परफॉर्मन्सही दाखवत आहे.

उर्वशीने (Urvashi Rautela) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाची सिल्व्हर सिक्वेन्स वर्क साडी परिधान करताना दिसत आहे. साडीसोबतच अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि एक लांब पोनीटेल केली आहे. जी फुलांच्या पांढऱ्या गजरात गुंडाळलेली दिसते. यासोबत उर्वशीने मॅचिंग ज्वेलरी घातली आहे. मोठ्या चांदीच्या बांगड्या, डायमंडची बिंदी, कानातले आणि हातात अंगठी घालून उर्वशीने तिचा लूक पूर्ण केला आहे. मेकअपबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने हेवी मेकअप केला आहे. उर्वशीची ही स्टाईल तिचा ट्रेडिशनल लूक स्टायलिश बनवत आहे.

व्हिडिओमध्ये उर्वशी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या ‘कजरा रे’ या प्रसिद्ध आयटम साँगवर डान्स करताना दिसत आहे. तिची किलर अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. उर्वशीची ही फॅन्सी स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे आणि तिच्या व्हिडिओंना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशी लवकरच रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिचा ‘ब्लॅक रोज’ हा थ्रिलर चित्रपटही लवकरच पाहायला मिळणार आहे. याचबरोबर उर्वशी ‘थिरुत्तू पायल २’ च्या हिंदी रिमेकमध्येही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच उर्वशी अरब फॅशन वीकमध्ये दिसली. जिथे ती सुमारे ४० कोटींचा सोन्याचा ड्रेस परिधान करून वॉक करत होती.

हेही वाचा –

मिथिला पालकरची ‘लिटिल थिंग्ज’ प्राजक्ता कोळीची ‘मिस मॅच्ड’सह पाहा ‘या’ ५ रोमँटिक वेबसिरिज

हिजाबच्या वादात कंगनाच्या पोस्टवर शबाना आझमी यांचे वक्तव्य, म्हणाल्या ‘भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही…’

ट्विंकल खन्नाने शेअर केला आई डिंपल कपाडिया यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो, चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न

हे देखील वाचा