बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या दिवसांपासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. नुकतच उर्वशी आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांचा नजरेला नजर भिडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्यानंतर उर्वशी आणि पंत यांच्याविषयी चर्चेला उधाण आलं. अशातच, अभिनेत्री उर्वशीला बघून लोक पंतच्या नावाची घोषणा करू लागले.
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिने बुधवारी (दि. 08 सप्टेंबर) मुंबईत गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्याचवेळी असे काही घडले की, ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच संतापली. झाले असे की, जेव्हा उर्वशी या कार्यक्रमात पोहोचली, तेव्हा ती शांततेत लोकांना भेटली. तिला पाहून लोकांनी ऋषभ-ऋषभ (Rishabh Pant) ओरडायला सुरुवात केली, पण तरीही अभिनेत्री शांत दिसली. मात्र, नंतर तिने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
या दरम्यानचा एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने एक कॅप्शनही लिहिले आहे, ज्यामध्ये या घटनेमुळे अभिनेत्रीला खूप राग आल्याचे दिसून येते. तिने लिहिले की, “हे सर्व थांबवा, नाहीतर…” उर्वशीच्या या कॅप्शनवरून असे दिसते आहे की, गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड संतापली असून तिने लोकांना याबाबत सावध केले आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी तिला ऋषभ पंतच्या नावाने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
उर्वशी रौतेला नुकतीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेली होती. त्यामुळे ती खूप चर्चेतही होती. खरं तर, एकदा तिने स्वतः सांगितले होते की, तिला मॅच बघायला आवडत नाही, पण जेव्हा ती अचानक स्टेडियममध्ये दिसली, तेव्हा लोकांनी तिचे नाव ऋषभ पंतशी जोडून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
स्वत:च्याच नवऱ्याला लिपलॉक केल्याने ट्रोल झाली होती अभिनेत्री, आता मौन सोडत ट्रोलर्सला चांगलंच झापलं
पतीचा फोन सतत लागत होता बिझी; भडकलेली कॅटरिना थेट म्हणाली, ‘कुणाशी बोलत होता रे? तुझ्यामुळे…’
‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल