Saturday, July 6, 2024

उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील नेहमीच प्रकाशझोतात असते. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच सोशल मीडियावर स्वत:चे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकारांचा कल दुबईच्या दिशेने वाढल्याचा दिसत आहे. अनेकांनी दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवला आहे. आता हा गोल्डन व्हिसा उर्वशी रौतेलाला देखील मिळला आहे. (Actress Urvashi Rautela got UAE golden visa)

अभिनेत्रीने या विषयीची माहिती स्वत: दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या हातामध्ये दुबईचा गोल्डन व्हिसा देखील आहे.

तिने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी पहिली भारतीय महिला आहे, जिला फक्त बारा तासांच्या आत दुबईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना हा व्हिसा मिळाल्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते. यूएइ सरकारची मी आभारी आहे.”

गोल्डन व्हिसा म्हणजे नेमक काय?
दुबईमध्ये कामानिमित्त आधी फक्त डॉक्टर, विद्यार्थी, शास्त्रज्ञ यांना हा गोल्डन व्हिसा दिला जात होता. यामुळे काम करणा-या व्यक्तींना दुबईमध्ये १० वर्षे राहता येत होते. आता तेथील शासनाने हा व्हिसा कलाकारांना देण्यास देखील मान्यता दिली आहे.

भारतीय कलाकारांमध्ये सर्वप्रथम अभिनेता संजय दत्तला हा व्हिसा मिळाला होता. त्यानंतर अनेक कलाकारांना हा व्हिसा देण्यात आला. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाला गोल्डन व्हिसा मिळाल्याने तिला दुबइमध्ये १० वर्षे राहता येणार आहे.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने साल २०१३ मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हनी सिंग बरोबरच्या ‘लव डोस’ या गाण्यामधून तिला विशेष पसंती मिळली. लवकरच ‘ब्लॅक रोज’ या आगामी चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

हे देखील वाचा