Wednesday, July 3, 2024

उर्वशी रौतेलाची जादू पाहिली का? हवेत लटकताना दिसली काकडी; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींचा भरणा आहे. यातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळेच चर्चेत असतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. उर्वशीचा सोशल मीडियावर मोठा वावर असतो. तिचे इंस्टाग्रामवर ४१.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अशातच तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत ती जादू दाखवताना दिसत आहे. तिची जादू पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि शेवटी पोट धरून हसाल. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तसेच तिच्या जादूची प्रशंसाही करत आहेत.

उर्वशीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओत दिसते की, एक काकडी हवेत लटकत आहे. ती या काकडीच्या वर- खाली, थोडे दूर आपले हात हलवताना दिसत आहे. त्यानंतर ती हात आजूबाजूला हलवते, पण ती काकडी पडत नाही. मात्र, जशी उर्वशी कॅमेऱ्याकडे पाहत तिरकी फिरते, तेव्हा समजते की, तिने तोंडामध्ये एक काट्याचा चमचा पकडला आहे. त्यामुळे काकडी हवेत लटकताना दिसत आहे. (Actress Urvashi Rautela Magic Video Viral On Social Media)

उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जर मी एक भाजी असते, तर क्यूट काकडी असते.” यासोबतच तिने काकडीचे आणि हार्ट इमोजीचाही आपल्या कॅप्शनमध्ये समावेश केला आहे. तिने हॅशटॅगसोबतच मॅजिशियन उर्वशीही (जादूगार उर्वशी) लिहिले आहे. उर्वशीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळत आहे. तसेच नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “मी पाहू शकतो की, तू कुठे जात आहेस.” दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हे कामही सुरू केले.” आणखी एक युजर म्हणाला की, “स्पष्ट दिसत आहे की, तोंडाने पकडले आहे.” याव्यतिरिक्त दुसरा एक युजर म्हणाला की, “हेच मिळालं व्हिडिओ बनवण्यासाठी.”आणखी एकाने म्हटले की, “कोणत्या लाईनमध्ये आलात आपण?” त्याचबरोबर एक युजर म्हणाला की, “नंतर हे कामही येईल.”

उर्वशीने यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ती ट्रोल झाली होती. या व्हिडिओत ती चंदेरी रंगाचा शिमरी आऊटफिटमध्ये दिसली होती. ड्रेसमध्ये स्लीव्ह्जऐवजी पंख लावले होते. तिने आलिशान ज्वेलरीही परिधान केली होती. तसेच डोळ्यांवर गडद काजळ लावले होते. यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. एकाने उर्वशीच्या ड्रेसला “रावणाचा ड्रेस,” असे म्हटले होते.

उर्वशीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात झळकली होती. याव्यतिरिक्त ती ‘इन्सपेक्टर अविनाश’ या टीव्ही सीरिजमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बजरंगी भाईजान’ फेम ‘मुन्नी’ने ‘या’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; व्हिडिओतील क्यूट अंदाजावर चाहतेही फिदा

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-आर्यन खान: जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान गर्दीमुळे तुटला कोर्टरूमचा दरवाजा, आज ३ वाजता होईल सुनावणी

हे देखील वाचा