Wednesday, July 3, 2024

उर्वशी रौतेलापेक्षा जास्त तिची आई आहे ग्लॅमरस, स्टाईलिश फोटो पाहून युजर्स म्हणाले, ‘बहीण वाटतेय…’

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) होय. उर्वशी ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. उर्वशीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. उर्वशीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले असतात. अलिकडेच उर्वशी मिस युनिव्हर्स २०२१ ची परीक्षक बनून चर्चेत आली होती. ती स्वतः खूप सुंदर आहे, मात्र तिची आई तिच्यापेक्षाही सुंदर आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, उर्वशीच्या आईला पाहून अनेक वेळा लोक तिला तिची मोठी बहीण मानतात. चला तर मग उर्वाशीच्या आईचे आणि उर्वशीचे काही खास फोटो पाहूया.

उर्वशीप्रमाणे  तिची आई देखील सोशल मीडियावर सक्रिय असते आणि सतत तिचे स्टाईलिश फोटो शेअर करत असते. मीरा रौतेला यांना देखील मोठ्या संख्येने युजर्स फॉलो करतात. उर्वशीही कधी-कधी तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही वर्षांपूर्वी जेव्हा उर्वशी तिच्या आईसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती, तेव्हाही तिचे सौंदर्य पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. मीरा रौतेला यांचा रविवारी (२ जानेवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त उर्वशीने त्यांचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

उर्वशीने तिच्या आईसोबत ग्लॅमरस अवतारात अनेकवेळा व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आणि आईच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. उर्वशीची आई मीरा रौतेला खूपच स्टाईलिश आहेत आणि त्या अनेकदा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसतात. उर्वशी मूळची उत्तराखंडमधील हरिद्वारची आहे. उर्वशीचे वडील मोठे उद्योगपती आहेत.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. उर्वशीने तिच्या करिअरची सुरुवात ही मॉडेलिंग पासून केली. परंतु आज बॉलिवूड विश्वात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उर्वशीचे सोशल मीडियावर ४४ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.

उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने ‘हेट स्टोरी ४’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘पागलपंती’, ‘सनम रे’, ‘सिंग साहब द ग्रेट’ यांसारख्या चित्रपटांत तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. तिच्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा