Wednesday, July 3, 2024

उर्वशी रौतेलाने बिकिनी घालून दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या ग्लॅमरस फोटो आणि अदाकारीसाठी ओळखली जाते. ती आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूक आणि अदाकरीच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने कुठलीही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. नुकतच आता तिने सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केला आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच उर्वशीने चाहत्यांना एक खास मेसेजही दिला आहे.

उर्वशीने दाखवला किलर परफॉर्मन्स
उर्वशीने सोशल मीडियावर खास पद्धतीने करवा चौथच्या दिवशी चाहत्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीने बेबी पिंक कलरची बिकिनी घातली आहे. यासह तिने टोपी घातली आहे. समुद्रकिनाऱ्यावर उर्वशी उभी राहून तिचा लूक दाखवत आहे. या दरम्यान, तिची स्टायलिस्ट तिचा आउटफिट ठीक करत आहे.

उर्वशीने करवा चौथच्या दिल्या शुभेच्छा
व्हिडिओ पोस्ट करताना उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी करवा चौथ २०२१.” उर्वशीच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट्सही येत आहेत. या व्हिडिओमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. तिचा मेकअप तिच्या आउटफिटसह परफेक्ट दिसत आहे. यासोबत उर्वशीला आपले हात पसरताना दिसत आहे.

रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अलीकडेच ती अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबत ‘वर्साचे बेबी’मध्ये दिसली होती. येत्या काळात ती जिओ स्टुडिओच्या आगामी वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. उर्वशी आता तमिळ चित्रपटांमध्येही आपले नाव कमवायला सज्ज झाली आहे. याशिवाय ती द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुतु पायले २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट

-बाबो! उर्वशी रौतेलाचा ड्रेस इतका महागडा की, त्या किंमतीत येऊ शकतं एखादं घर, पाहा फोटो

-ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, उर्वशी रौतेलाने केलं ‘असं’ ट्वीट; आता करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

हे देखील वाचा