Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या ग्लॅमरस फोटो आणि अदाकारीसाठी ओळखली जाते. ती आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिने आपल्या अदाकारीच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते, तसेच सतत तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने  पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. नुकतच आता उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला खूप सुंदर दिसत आहे. इतकेच नाही, तर ती व्हिडिओमध्ये डोळा मारताना देखील दिसत आहे. तिच्या याच अदाकारीने चाहते घायाळ झाले आहेत. तिचा हा मोहक अंदाज चाहत्यांवर भुरळ घालत आहे. उर्वशीच्या या व्हिडिओवर चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला दिसली डोळा मारताना
बॉलिवूड ब्युटी उर्वशी रौतेला तिच्या खास आणि अनोख्या पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे. अलीकडेच, तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. या व्हिडिओमध्ये ती डोळा मारताना दिसत आहे. चाहते तिच्या या स्टाइलने वेडे झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, “मी वेगळी आहे.” हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

मोठ्या प्रोजेक्टवर काम करतेय अभिनेत्री
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झाले, तर ती ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदीप हुड्डा याच्यासोबत दिसणार आहे. उर्वशी आता तमिळ चित्रपटांमध्येही आपले नाव कमवायला सज्ज झाली आहे. याशिवाय ती द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुतु पायले २’ मध्ये दिसणार आहे.

 

 

हे देखील वाचा