Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीने केले होते लक्स साबणाच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा काम, कंगण या चित्रपटाने मिळाली प्रसिद्धी

‘या’ अभिनेत्रीने केले होते लक्स साबणाच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा काम, कंगण या चित्रपटाने मिळाली प्रसिद्धी

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना दीवाना बनवत असतात. चित्रपटाद्वारे त्या घराघरात पोहचतात. काही अभिनेत्री ह्या चित्रपटा सोबतचा अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसतात. तेथून त्यांना ओळख मिळते. यामध्ये लक्स साबणाची जाहिरात खूपच लोकप्रिय होती. यामध्ये अनेक अभिनेत्रींनी काम केले आहे. पण या जाहिरातीमध्ये सगळ्यात आधी कोणी कोणी काम केले आहे, याबाबत कोणाला माहीत आहे का ?? या जाहिरातीमध्ये ऐश्वर्या रॉय आणि करीना यांनी काम केले आहे. पण आज आम्ही सांगणार आहोत या जाहिरातीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणी काम केले होते.

बॉलिवूड मधील ब्लॉकबस्टर ‘कंगण’ या चित्रपटाची अभिनेत्री लीला चिटणीस हिने लक्स साबणाच्या जाहिरातीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काम केले आहे. लीला ही पहिली भारतीय अभिनेत्री होती जिने १९४१ मध्ये लक्स साबणाच्या जाहिरातीमध्ये काम केले होते . तिला महाराष्ट्राची पहिली ग्रॅज्युएट सोसायटी लेडी म्हटले जाते.

लीला ह्या‌ अभिनेत्री काजोलची पणजी आहे. लीला यांना त्यांच्या लग्नानंतर चार मुले झाली. पण त्या त्यांच्या पती पासून वेगळ्या राहत होत्या. त्यानंतर त्यांनी एका शाळेत शिकवायला सुरुवात केली. तेथील मुलांना शिकवण्यासोबतच त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती . नाटकात काम करता करता त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांचे आयुष्य पालटून गेले. त्यांना ‘जेंटलमॅन डाकू’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळली. या चित्रपटात त्यांनी मुलांची कपडे घालून अभिनय केला होता. त्यानंतर १९३६ मध्ये आलेल्या ‘छाया’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली.

या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांची अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर त्यांना अशोक कुमार यांच्यासोबत ‘कंगण’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट संबोधले जाते. या चित्रपटातील किशोर कुमार आणि लीला यांच्या जोडीला देखील खूप प्रेम मिळाले होते. त्यानंतर अशोक कुमार आणि लीला यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी ‘शहीद’ या चित्रपटात पहिल्यांदा दिलीप कुमार यांच्यासोबत आईचे पात्र निभावले होते.

लीला या शेवटच्या १९८७ मध्ये ‘दिल तुझको दिया’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले, आणि त्यांच्या मुलासोबत अमेरिकामध्ये जाऊन राहिल्या. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

हे देखील वाचा