सध्या सिनेसृष्टीत कोणत्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत असेल तर आलियाच्या प्रेग्नन्सीची. खरंतर एप्रिल २०२२ मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट यांचं लग्न झालेलं. लग्नाबद्दलही खूप बातम्या समोर आलेल्या आणि आता लग्नाला महिने दोन महिने होतात न तोच आलिया आणि रणबीरने त्यांना बाळाची चाहूल लागल्याचीही बातमी दिली. त्यामुळे अगदी करियरच्या पिकवर असताना आलिया आणि रणबीरने हा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अनेक स्टार्सने त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण याबरोबरच आलियाचं यासाठीही कौतुक होतंय की प्रेग्नंट असतानाही ती तिच्या शुटच्या कमिटमेंट पूर्ण करत आहे. पण मंडळी आलिया ही काही पहिली बॉलिवूड अभिनेत्री नाही, जी प्रेग्नंट असतानाही शूट करत आहे. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नंसीतही चित्रपटांचे शूट पूर्ण केले आहेत. कोणत्या आहेत या अभिनेत्री चला पाहूया.
‘शोले’ चित्रपट माहित नसणारा माणूस भारतात सापडणे जवळपास अशक्य आहे, नाही का. या चित्रपटात फार काही डायलॉग नसतानाही जया बच्चन यांचं पात्र सर्वांच्या लक्षात राहातं. पण तुम्हाला माहित आहे का की जया बच्चन या चित्रपटावेळी प्रेग्नंट होत्या. असंही सांगितलं जातं की त्यांच्या साडीने बेबी बंप लपवण्यात आला होता. तसेच त्यावेळी अमिताभ यांनी जया यांची त्यावेळी खुप काळजी घेतलेली.
बॉलिवूडमधील पहिली महिला सुपरस्टार म्हणून जिला ओळखले जाते ती म्हणजे श्रीदेवी. तिचे अनेक चित्रपट हिट झाले. तिचा जुदाई हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. पण अनेकांना माहित नाही, की ती या चित्रपटाच्या शूटवेळी प्रेग्नंट होती. पण तिने शूट पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. तिने नंतर तिची मोठी मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिल्यानंतर चित्रपटांमधून काही वर्षे ब्रेक घेतलेला.
झंकार बिट्स चित्रपटावेळी जुही चावला चक्क सात महिन्यांची प्रेग्नंट होती, अनेकांना तर हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. त्यावेळी तीच्या दुसऱ्या अपत्याची आई होणार होती. विशेष म्हणजे जुही चावला जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट होती, त्यावेळीही तिने एक रिश्ता आणि आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या या प्रोजक्टसाठी काम केलं होतं.
या यादीत करिना कपूर देखील आहे. ती दुसऱ्यांदा जेव्हा प्रेग्नंट होती त्यावेळी तिने लाल सिंग चढ्ढा चित्रपटाचे अमीर खानबरोबर शूट केले होते. त्यावेळी चित्रपटाच्या मेकर्सने तिचा बेबी बंप व्हीएफएक्सच्या मदतीने घावण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट ऑगस्ट 2022 मध्ये रिलीज होणार आहे. करिनाने तिच्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतरही चित्रपटसृष्टीत काम करणे सुरू ठेवले आहे. तिने गेल्या अनेकवर्षांपासून मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले असून अजूनही ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.
आपल्या सौंदर्याने आणि आदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधूरी दिक्षित. तिने तिच्या अभिनयाबरोबरच डान्सनेही अनेकांकडून कौतुक मिळवले आहे. तिची देवदास चित्रपटातील भूमिकाही चांगलीच गाजली होती. अनेक रिपोर्ट्सनुसार असं म्हटलं जातं की या चित्रपटाच्या शूट वेळी ती देखील प्रेग्नंट होती. तिने प्रेग्नंट असतानाही लेहंगा घालून डान्सही केला होता.
२००० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री काजोल अजय देवगनबरोबर आनंदाने संसार करत आहे. त्यांना एक मुलगी आणि मुलगाही आहे. पण हे माहित आहे का की काजोल जेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा ती वी आर फॅमेली चित्रपटाचे शूट करत होती. तिने या चित्रपटासाठी प्रेग्नंट असतानाही प्रमोशन केले होते. त्यानंतर तिने मुलगा युगला जन्म दिलेला.
ए थर्सडे हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात नेहा धुपिया पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली आहे. पण या भूमिकेसाठी शूट करत असताना नेहा धूपिया दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती.
हेही वाचा –
अबब! प्रेग्नेंसीतही ‘या’ अभिनेत्रींनी केले चित्रपटाचे शुटिंग
संजय लिला भन्साळी आणि ऐश्वर्या रायमधील नाते आहे खूपच खास, पहिल्यांदाच केला खुलासा
‘सैराट’ फेम सल्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप, फेसबूक पोस्ट करत वाचला तक्रारीचा पाढा