Monday, July 15, 2024

झरीन खानने अनेक वर्षांनी शेअर केली मनातील गोष्ट; म्हणाली, ‘मी सलमानच्या पाठीवरचे माकड…’

अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळेच ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे चाहतेही तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करतात. तिने २०१० मध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत (Salman Khan) ‘वीर’ या चित्रपटातून पदार्पण केले. असे म्हटले जाते की, सलमानसोबत करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रींचे करिअर आपापल्या परीने जाते, पण झरीन खानसोबत असे घडले नाही. चित्रपटसृष्टीत तिला विशेष काही मिळवता आले नाही.

झरीन खान म्हणाली ‘मी सलमानच्या पाठीवर माकड बनून राहू शकत नाही’
झरीन म्हणते की, ती सलमान खानच्या पाठीवर माकड बनून राहू शकत नाही. एका मुलाखतीत झरीन म्हणाली की, ती इंडस्ट्रीत खूप समाधानी आहे. तेही कोणत्याही शर्यतीत भाग न घेता. ती म्हणते की, “लोक अजूनही मानतात की, सलमान खान मला मदत करत आहे. याबद्दल मी सलमानचे आभार मानत असले तरी, जेव्हा मी इंडस्ट्रीचा एक भाग बनले तेव्हा माझा संघर्ष सुरू झाला.”

मात्र, इंडस्ट्रीत येण्याची संधी दिल्याबद्दल ती सलमान खानचे आभार मानायला विसरली नाही. झरीन म्हणते की, “सलमान खूप चांगला माणूस आहे. तो खूप व्यस्त आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी त्याच्या आणि त्याच्या भावांच्या पाठीवर माकड बनून राहू शकत नाही.” झरीनने तिच्या मुलाखतीत सांगितले की, “लोकांना वाटते की, ती जे काही काम करत आहे, ते सलमानमुळेच आहे. पण ते तसे नाही.” ती म्हणाली की, “सलमान माझा चांगला मित्र आहे. त्यामुळे मी त्याला सतत त्रास देत नाही.”

१२ वर्षांची कारकीर्द
‘वीर’ या चित्रपटातून २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर झरीन खानने ‘रेडी’, ‘हाऊसफुल २’, ‘हेट स्टोरी ३’, ‘अक्सर २’, ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा