कलाकार नेहमीच त्यांच्या फोटोशूटमुळे चर्चेत येतात आणि लाइमलाइट घेऊन जातात. वेगवेगळ्या अंदाजातील त्यांचे फोटोशूट फॅन्समध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरते. या फोटोशूटच्या निमित्ताने कलाकारांचे विविध लूक्स आणि अवतार पाहायला मिळतात. त्यामुळे फोटोशूट नेहमीच कलाकारांसाठी आणि फॅन्ससाठी एक पर्वणी असते. कलाकार नेहमीच त्यांच्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सर्वच कलाकार फोटो शेअर करतात. नुकतेच जरीन खानने देखील तिचे ग्लॅमरस फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
या फोटोंमध्ये जरीन खानने आकाशी रंगाचा बोल्ड ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय मादक आणि आकर्षक दिसत असून, तिच्या या लूकवर तिचे जड कानातले लूक पूर्ण करण्यास मदत करत आहेत. तिचा लूक आणि हे फोटो कमालीचे व्हायरल होत असून, फॅन्सच्या एका पेक्षा एक कमेंट्स येत आहे. जरीन नेहमी तिच्या फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. जरीन जरी तिच्या करियरमध्ये यशस्वी झाली नसली, तरी तिने लोकप्रियता आणि प्रसिद्धी भरपूर कमावली आहे.
जरीनला डॉक्टर व्हायचे होते. मात्र योगायोगाने ती या इंडस्ट्रीमध्ये आली. २०१० साली तिने सलमानसोबत ‘वीर’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. जरीनला या सिनेमातून कॅटरिनाची डुप्लिकेट कॉपी ही ओळख मिळाली.
यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यात ‘रेडी’, ‘हाऊसफुल ३’, ‘१९९१’, ‘हेट स्टोरी’ या हिंदी सिनेमांसोबतच काही पंजाबी, तेलगू चित्रपटांचा देखील समावेश आहे. जरीन सलमानच्या ‘रेडी’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. या सिनेमात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘कॅरेक्टर ढिला’ गाणे तुफान गाजले. सुरुवातीला जरीनला तिच्या वजनावरून खूप ट्रोल केले गेले. मात्र तिने तिच्या मेहनतीने तिचे वजन कमी केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल
-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख