Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड सोशल मीडिया पोस्टमुळे सतत वादात अडकणाऱ्या हिंदी-मराठी अभिनेत्री

सोशल मीडिया पोस्टमुळे सतत वादात अडकणाऱ्या हिंदी-मराठी अभिनेत्री

एकीकडे अभिनेत्रींच्या लूक्स, स्टाईल यांच्या चर्चा होत असतात. एखाद्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भुमिका, त्यांची स्टाईल हा विषय चर्चेचा ठरतो. दुसरीकडे काही अभिनेत्री आशाही असतात, ज्या त्यांच्या लूक्स, स्टाईल आणि चित्रपटांबरोबरच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने बातम्यांमध्ये येत असतात. बरं त्या पोस्टमध्ये फक्त त्यांचे छानछान फोटो वैगरे शेअर करत नाही, तर काही वादग्रस्त कमेंट करत वादही ओढून घेतात. नुकतेच साई पल्लवीने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची तुलना मॉब लिंचिंगशी केली, त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय… पण अशा वादग्रस्त विधान करणारी ती पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वीही अनेक हिंदी-मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या पोस्ट्समुळे, विधानांमुळे टिकेच्या धनी ठरतात. 

या यादीत पहिलंच नाव आठवतं, ते म्हणजे केतकी चितळेचं. (ketaki chitale) काही दिवसांपूर्वीच केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तिच्यावर मोठ्याप्रमाणत टिका झाली. याबरोबरच विविध ठिकाणी तिच्याविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर तिला अटकही झाली होती. पण केतकीची ही पहिलीच वेळ नव्हती की तिने काही वादग्रस्त पोस्ट केली होती. याआधीही ती आशाच गोष्टींमुळे वादात अडकली आहे. तिने एकदा एका पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने तिला ट्रोल व्हाले लागलेले, तर एकदा एका पोस्टमध्ये जाती धर्मांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती.

या यादीतील दुसरे नाव म्हणजे कंगना रणौत. (kangana ranaut) बॉलिवूड अभिनेत्री कंगना अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. एकदा तर तिचे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड करण्यात आलेलं. तिने अनेकदा राजकाराणाबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. बंगालमधील निवडणूंकावेळीही तिने बंगालमधील हिंसेबद्दल वादग्रस्त पोस्ट केले होते. तसेच तिने केवळ राजकारणाबद्दलच नाही, तर अनेकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दलही बोलतानाही ती अनेकदा वादात अडकली होती. तिचे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील विधानंही चर्चेचा विषय ठरली होती.

वादात अडकणाऱ्या अभिनेंत्रीमधील पुढील नाव म्हणजे रिचा चढ्ढा. (richa chaddha) आत्ताही जरी रिचाचे ट्विटर अकाऊंट उघडून पाहिले, तर तुम्हाला अनेक राजकारणाच्या बाबतीतील पोस्ट तिने रिट्वीट केल्याचे दिसेल. ती अशाच तिच्या काही वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरत असते. रिचा नेहमीच सामाजिक प्रश्नावर आपले मत मांडत असते. त्यामुळे तिला बऱ्याच वेळा ट्रोलिंग देखील सामना करावा लागतो. तिने एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) हिचेही नाव या यादीत येऊ शकते. ती देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अनेकदा तिच्या पोस्टमुळे ती वादातही अडकते. तिने काहीदिवसांपूर्वी स्त्रीच्या अंतवस्त्रांबद्दल केलेली पोस्टही बरीच चर्चेत आली होती. त्याचबरोबर ट्रोल करण्यांना पण उत्तर देण्यासाठी तिने पोस्ट केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘द घोस्ट’ चित्रपटात दिसणार नागार्जुनचा डॅशिंग लूक, अंगावर काटे आणणारा टिझर एकदा पाहाच

आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज! सलमान-रितेश दिसणार एकाच चित्रपटात?

अगंबाई ऐकावं ते नवलंच ! ‘या’ कारणामुळे राधिका आपटेकडे नाही लग्नाचा एकही फोटो

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा