बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आजही त्याची आई मोना कपूरवर किती प्रेम करतो हे सांगण्याची गरज नाही. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याचे चाहते आणि मित्रांचे डोळे ओलावले आहेत. नुकतीच अर्जूनने त्याची आई मोना कपूरच्या स्मरणार्थ एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे त्यांच्या आईसोबत एक वेगळेच नाते शेअर करतात. आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने सोशल मीडियावर जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. अर्जुनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या आईचा फोटो प्रेयर रुमच्या भिंतीवर अडकवलेला दिसत आहे.
अर्जुनने लिहिल्या ‘या’ गोष्टी
आईचा फोटो शेअर करत अर्जुनने (Arjun Kapoor) लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई… फोनमध्ये तुझे नाव पाहणे खूप मिस करतो. मला तुझी आणि अंशुलाची कधीही न संपणारी चर्चा आठवते. मला तुझी खुप आठवण येते आई. तुझे नाव घेणे खूप मिस करतो… तुझा सुगंध मिस करतो. मी प्रौढ होणे आणि आपल्या सर्व समस्यांचे निराकरण मिस करतो… मला माझे बालपण आठवते. मी तुझ्याबरोबर हसणे मिस करतो. मी ठीक राहणे मिस करतो. तू सदैव माझ्या पाठीशी होतीस म्हणून मला सगळ्या गोष्टींची आठवण येते. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तू आमच्यासोबत आहेस आणि मला आशा आहे की माझे हे व्हर्जन तुला आवडेल आणि अभिमान वाटेल. तुझ्यावर प्रेम आहे.. तुझा प्रामाणिक चिबी चिकी मुलगा….”
बॉलिवूड डेब्यूपूर्वी अर्जुनने गमावली आहे आई
बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर होती. श्रीदेवी यांच्या आयुष्यात येताच बोनी कपूर मोना कपूरपासून दुरावले होते आणि १९९६ मध्ये दोघेही वेगळे झाले होते. काही वर्षांनंतर मोना कपूरला कर्करोगाचे निदान झाले आणि अर्जुन कपूरचा पहिला चित्रपट ‘इशकजादे’ प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी तिने जगाचा निरोप घेतला. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अर्जुन कपूर लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘डॉग’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अर्जुन कपूरचा ‘द लेडी किलर’ नावाचा चित्रपटही आहे.
हेही वाचा :