Monday, July 8, 2024

ही मैत्रीच की, नव्याने प्रेमाची चाहूल! आशा नेगीने एक्स बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…

टेलिव्हिजन अभिनेत्री आशा नेगी आणि अभिनेता ऋत्विक धनजानी हे दोघे एकेकाळी त्यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होते. परंतु ६ वर्षानंतर त्यांनी ब्रेकअप केले आणि वेगळे झाले. त्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. परंतु आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. ब्रेकअप झाले असले तरीही ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. शुक्रवारी (५ नोव्हेंबर) ऋत्विकचा वाढदिवस होता. यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेंड आशा नेगी हिने सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

आशा नेगीने इंस्टाग्राम स्टोरीला ऋत्विकचा एक फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने एक सुंदर पोस्ट देखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे ऋत्विक तुला आयुष्यात खूप यश आणि आनंद मिळो.” आशाने या फोटोमध्ये हग फेस आणि स्टार ईमोजी पोस्ट केली आहे. ब्रेकअपनंतर एक वर्षांनी देखील ते एकमेकांसाठी पोस्ट शेअर करत असतात. ऋत्विकने देखील आशाच्या वाढदिवशी एक सुंदर पोस्ट लिहून तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

Photo Courtesy: Instagram/ashanegi

काही महिन्यांपूर्वी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत आशाने सांगितले होते की, “आमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे. जेव्हा आम्हाला एकमेकांशी बोलवे वाटते तेव्हा आम्ही बोलतो. आम्ही खूप गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. आता सगळं काही ठीक आहे. आम्ही दोघेही आता पुढे सरकलो आहोत. आता एक वर्ष झाले आहे त्यामुळे पुढे गेलेच पाहिजे. आम्ही एकमेकांसाठी चांगला विचार करतो. मला त्याला यशाच्या शिखरावर पोहचलेला आणखी खुश बघायचे आहे.”

आशा नेगी ही ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. या शोनंतर अनेक दिवस ती लाईमलाईटपासून दूर राहिली. त्यानंतर ती एकता कपूरच्या ‘बारिश’ आणि ‘बारिश २’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘ख्वाबों के परिंदे’ या शोमध्ये काम केले होते.

ऋत्विक आणि आशा हे दोघे ‘नच बालिये ६’ या शोचे विनर आहेत. ऋत्विक देखील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत होते. तिथेच त्या दोघांची ओळख झाली होती. तसेच तो एक उत्कृष्ट सूत्रसंचालक देखील आहे

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा