Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

म्युझिकशिवाय तारा सुतारियाने लावले जोरदार ठुमके, पाहा तिचा ‘हा’ भन्नाट व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर डान्स आणि गायनानेही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. यामध्ये अभिनेत्री तारा सुतारिया हिचाही समावेश आहे. ताराने अनेकवेळा आपले डान्स कौशल्य सिद्ध केले आहे. नुकतेच तिने आपला शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क तारा म्युझिकशिवाय डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. यासोबतच तो जबरदस्त व्हायरलही होत आहे.

व्हिडिओमध्ये ताराचे जबरदस्त मुव्हज पाहायला मिळत आहेत. तिच्या आजूबाजूला सर्व टीमही आहे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली तारा निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहे. ताराचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडत आहे. कलाकारांसोबतच अनेक युजर्स कमेंट करून तिच्या या व्हिडिओची प्रशंसा करत आहेत.

ताराने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जेव्हा तुम्ही सेटवरच आपल्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करता.” या व्हिडिओमध्ये ती शूटिंग सेटवर दिसत आहे, जिथे ती बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओवर एका चाहत्याने लिहिले की, ‘असं वाटतंय की तू राणीच आहेस.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘तू इतकी सुंदर का आहेस?’ याव्यतिरिक्त एका चाहत्याने ‘माझी सुंदर लहान बाहुली‘ असे लिहिले आहे.

ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची ‘मरजावां’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेेश देशमुखही मुख्य भूमिकेत होते. याव्यतिरिक्त तारा आता ‘एक व्हिलन २’, ‘तडप’ आणि ‘हीरोपंती २’ या चित्रपटात झळकणार आहे.

हे देखील वाचा