Saturday, June 29, 2024

नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्यानंतर अदा शर्माने डिलीट केली बोल्ड पोस्ट; म्हणाली, ‘बप्पी दा…’

अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावरून नेहमीच ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. मात्र काही दिवसापूर्वी तिने केलेली एक पोस्ट तिला चांगलीच महागात पडली असून नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केल्यानंतर तिला हि पोस्ट डिलीट करावी लागली आहे. नेमकी काय होती ती पोस्ट चला जाणून घेऊ.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्मा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. यामागे कारण होते तिने केलेली एक पोस्ट. अदा शर्माने काही दिवसाआधी दिवंगत गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. असंख्य नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे तिला ही पोस्ट डिलीट करावी लागली. मात्र तिने हा फोटो कशाप्रकारे पोस्ट झाला, याचे कारण सांगितले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री अदा शर्माने काही दिवसांपूर्वी एक ब्लेजर घातलेला फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने गळ्यात आणि हातात सोने घातल्याचे दिसत होते. या फोटोसोबत अदाने दिवंगत गायक बप्पी लहरी यांचा फोटो जोडला होता. त्यांनी सुद्धा गळ्यात सोने घातले होते. हा फोटो शेअर करत अदाने आपल्या चाहत्यांना “कोणी चांगले सोने घातले आहे?” असा प्रश्न केला होता. म्हणजेच तिने बप्पीदाच्या सोन्याची थट्टा उडवल्याचे दिसत होते. यावरुनच सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.

आता अदाने हा फोटो डिलीट करत त्याचे कारण सांगितले आहे. अदा आणि तिच्या टीमने हे कृत्य मुद्दाम केले नव्हते, तर हा फोटो पोस्ट करण्याचे शेड्युल एक महिना आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे ठरवलेल्या वेळेत ती पोस्ट व्हायरल झाली नाही. जेव्हा पोस्ट व्हायरल झाली, मात्र तेव्हा बप्पी लहिरी यांचे निधन झाले होते. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अदाने हे जाणून बुजून केले नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तिचा हा फोटो दोन वर्षापूर्वीचा असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र या पोस्टमुळे तिला नेटकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. या फोटोवर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. यावर एका युजरने, “अशा प्रकारची तुलना करताना तुला लाज वाटली पाहिजे” अशा कडक शब्दात टीका केली होती. तर आणखी एकाने “अशा चांगल्या व्यक्तिमत्वाची चेष्टा करताना काहीच कसे वाटत नाही” असे म्हणत जोरदार हल्ला चढवला होता. आता आपली चूक लक्षात आल्यानंतर अदाने हा फोटो डिलीट केला आहे.

हेही वाचा- 

हे देखील वाचा