Sunday, April 20, 2025
Home अन्य रस्त्यावर आईसक्रीम खाणे अदा खानला पडले असते भलतेच महागात, खाता-खाता गेला होता…

रस्त्यावर आईसक्रीम खाणे अदा खानला पडले असते भलतेच महागात, खाता-खाता गेला होता…

एकता कपूर यांच्या ‘नागीण’ मालिकेतील इच्छाधारी नागीणीचे पात्र निभावलेली अभिनेत्री अदा खान ही अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटोंनी ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही हसून लोट पोट होऊन जाल.

अदा खानने तिचा हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अदा जमिनीवर कोसळता कोसळता वाचते. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये अदा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये ती आइस्क्रीम खात खात रस्त्यावरून चालत असते. आणि तितक्यात तिचे आइस्क्रीम खाली पडते. एवढंच काय तर अदा देखील पडणार असते. पण ती पडता पडता वाचते. या व्हिडिओमधील तिचे तोंड बघून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

हा व्हिडिओ शेअर करत अदाने लिहिले आहे की,” तुमच्या आयुष्यात देखील असे कधी झाले आहे का?? असेल तर नक्की कमेंट करून सांगा.” तिच्या या मजेशीर व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून तिला हसत आहेत. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर टेलिव्हिजन वरील अभिनेत्री सृष्टी रोडे‌ हिने कमेंट केली आहे. तिने ‘हाहाहा क्यूट’ असे म्हणत अदाच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सोबतच किश्वर मर्चंट, निशा रावल, मिलिंद गडगकर अश्या अनेक कलाकारांना तिच्या या व्हिडिओवर हसण्याची ईमोजी पोस्ट करून कमेंट केली आहे.

हे देखील वाचा