Friday, July 5, 2024

झी मराठी पुरस्कार सोहळा: आदेश भाऊजींनी ‘पैठणी’ देऊन केला कॅटरिना कैफचा सन्मान

लवकरच झी मराठीवर ‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१’ दाखवला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची शूटिंग देखील पूर्ण झाली आहे. सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अशातच या शोमधील आदेश बांदेकर आणि कॅटरिना कैफ यांचा एक सुंदर फोटो समोर आला आहे. आदेश बांदेकर हे गेले अनेक वर्ष ‘होम मिनिस्टर’ म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. अनेक वहिनींचा त्यांनी पैठणी देऊन आदर सन्मान केला आहे.

अशातच सगळ्यांच्या लाडक्या आदेश भाऊजींनी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा पैठणी देऊन सन्मान केला आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि कॅटरिना कैफ हे त्यांच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी कॅटरिनाला पैठणी दिली. महाराष्ट्राचे महावस्त्र असलेली पैठणी जेव्हा कॅटरिनाने घेतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिचा आनंद दर्शवत होते. (Adesh bandekar gives paithani to katrina kaif on Zee Marathi award function 2021)

रोहित शेट्टी आणि कॅटरिना कैफ सोबतच सगळ्यांचा आवडता अभिनेता गोविंदा देखील झी मराठी पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावताना दिसणार आहे. त्याची देखील या शोमध्ये ग्रँड एन्ट्री पाहायला मिळणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे. झी मराठीचे सगळेच प्रेक्षक या वर्षी हा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी उत्सुक आहेत. हा पुरस्कार सोहळा शनिवारी (३०ऑक्टोबर) रोजी झी मराठीवर संध्याकाळी ७ वाजता टेलिकास्ट केला जाणार आहे. त्यावेळी आपल्याला या सोहळ्यातील अनेक गमतीजमती पाहायला मिळणार आहेत.

याआधी देखील झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच या वर्षी झी मराठीवर तब्बल ५ नवीन मालिका आल्याने या वर्षी नक्की कोणाला कोणते पुरस्कार मिळतील हे बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच सुंदर! परी बनून अक्षया देवधरने चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, एक नजर टाकाच

-आजही कायम आहे किशोरी शहाणेंचं सदाबहार सौंदर्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

-स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; श्रियाच्या स्टाईलनेे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा