Saturday, July 6, 2024

राखीचा नवरा आदिल दुर्राणीचा कबुलीजबाब व्हायरल, ‘ड्रामा क्वीन’ची मागितली माफी, पाहा व्हिडिओ

एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आले आहे. अभिनेत्रीचा पती आदिल खान दुर्रानी यांनी तिच्यासोबतचे लग्न मान्य केले आहे. याआधी जेव्हा राखीसोबतचे कोर्ट मॅरेज फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हा आदिलने अभिनेत्रीसोबतचे लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये आदिलने हे दोघे पती-पत्नी असल्याचे मान्य करण्यासही नकार दिला हाेता. मात्र, आदिलच्या नव्या पोस्टवर राखीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण, आदिलने सर्वांसमोर त्याचे प्रेम, लग्न आणि राखीला पत्नी म्हणून स्वीकारले आहे.

तर झाले असे की, आदिलने त्याच्या इंस्टाग्रामवर राखीसोबतचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने राखीसाठी एक प्रेमळ संदेशही लिहिला आहे. आदिलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,”राखी मी तुझ्याशी लग्न केले नाही असे कधीच म्हटले नाही. फक्त काही गोष्टी हाताळायच्या होत्या, म्हणूनच गप्प राहावे लागले, राखी (पप्पुडी) वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Times (@delhi.times)

आदिलच्या या पोस्टवर राखी सावंतनेही कमेंट केली आहे. पतीच्या या पोस्टला लाईक करत तिने कमेंट बॉक्समध्ये लिहिले,’धन्यवाद प्रिय. भरपूर प्रेम’.

गंमत म्हणजे आदिलच्या या पोस्टनंतर राखीला आदिलसोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना पाहिले. यादरम्यान राखीच्या चेहऱ्यावर हसू दिसत हाेते. या व्हिडिओमध्ये राखीसोबतच्या लग्नाची पुष्टी करताना आदिल तिचे अभिनंदन करत आहे तर राखी आदिलच्या बोलण्याने भावूक झालेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chotu pandey (@shaileshpandeyy)

या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला आदिल राखीला चिडवताना आणि तिची नक्कल करताना दिसत आहे. यावर राखी पुन्हा भावूक हाेते आणि म्हणते, “कोणतीही महिला असेलं तर ती रडेल, पण आज मी खूप आनंदी आहे. आदिल माझ्या पतीने होकार दिला आहे. जनतेचे, मीडियाचे खूप खूप आभार…” पुढे व्हिडिओ क्लिपमध्ये आदिल सर्वांसमोर हात जोडून राखीची माफी मागताना दिसत आहे.(adil durrani finally confirms his marriage with actre`s`s rakhi sawant and accepted her as his wife in front of the media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा