हिंदी सिनेमासृष्टीतील सर्वात महागडा सिनेमा असलेला ‘आदिपुरुष’ हा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. प्रभास आणि कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच रामनवमीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले. मात्र या नवीन पोस्टरमुळे पुन्हा एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. असे सांगितले जात आहे की, या नवीन पोस्टरमुळे लोकांच्या भावनांना ठेस पोहचली आहे. कारण या पोस्टरमधून भगवान राम यांना चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच आता दिग्दर्शकांसोबतच कलाकारांवर देखील एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
दिग्दर्शक ओम राऊत त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या सिनेमामुळे मोठ्या संकाटात सापडला आहे. सर्वात आधी चित्रपटाच्या टीझरने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर आता सिनेमाच्या नवीन पोस्टरवर देखील वादंग मजला आहे. या पोस्टरवर राम यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्यावरून सनातन धर्माचे संत असणाऱ्या संत संजय दीनानाथ तिवारी यांनी मुंबई येथील साकीनाका पोलीस ठाण्यात हायकोर्टाचे वकील असणाऱ्या आशिष रॉय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत केस दाखल केली आहे.
View this post on Instagram
या तक्ररीमध्ये संजय यांनी लिहिले आहे की, पवित्र ग्रंथ असलेल्या ‘रामचरितमानस’वर आधारीत आणि श्री राम यांची बायोग्राफी असलेला ‘आदिपुरुष’ हा सिनेमा बनवला जात आहे. या ग्रंथात ज्या पद्धतीने श्रीराम यांची छबी दाखवली गेली त्याच्या उलट ‘आदिपुरुष’ सिनेमातील पोस्टर तयार केले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ), २९८, ५००, ४३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याच्या मागणीसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यासोबतच तक्रार दाखल करणाऱ्यांनी म्हटले आहे की, “सनातन धर्म अनेक युगांपासून ‘रामचरितमानस’ या पवित्र ग्रंथाचे पारायण करीत त्याचे पालन करत आहे. त्यात सांगितल्यानुसार हिंदू धर्मात प्रभू श्री राम आणि इतर सर्व पात्रांचे खास महत्त्व आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रामायणातील सर्व कलाकारांना जानवे न घालता दाखवण्यात आले आहे आणि ते चुकीचे आहे,”
नुकत्याच नव्याने प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये क्रिती सेनॉनच्या भांगात कुंकू नसल्याने तिला अविवाहित स्त्री दाखवण्यात आले आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी हे मुद्दाम केले असल्याचे देखील त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा
मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास