ओम राऊतचा बहुप्रतिक्षित आणि सतत वादात अडकणार सिनेमा ‘आदिपुरुष’ खूपच चर्चेत आहे. प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन अशी दमदार कास्ट असणाऱ्या या सिनेमाने घोषणेनंतरच लाइमलाइट मिळवण्यास सुरुवात केली आहे. रामचरितमानस या महाकाव्यावर आधारित या सिनेमाचे राम नवमीच्या दिवशी नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता हनुमान जयंतीच्या निमित्ताने सिनेमातील हनुमानाचा लूक समोर आणला गेला आहे. हनुमान जयंतीच्या खास दिवशी या लूकने सर्वांचीच मने जिंकली आहे. यासोबतच या सिनेमात हनुमान ही भूमिका कोण साकारणार यावरून देखील आता पडदा उठवण्यात आला आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही देवदत्तसाठी खूपच मोठी बाब आहे. बॉलिवूडमध्ये एवढा मोठा सिनेमा आणि इतकी महत्वाची भूमिका त्याच्या वाट्याला आल्याने तो खूपच खुश आहे. सिनेमाचे दिग्दर्शक आणि कलाकार यांनी सर्वानीच हे पोस्टर शेअर करत सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता प्रभासने हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “रामचा भक्त हनुमान आणि रामकथेचा प्राण…जय पवनपुत्र हनुमान!!!”
View this post on Instagram
हनुमान जयंतीच्या खास दिनी प्रदर्शित केलेल्या या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मागील बऱ्याच काळापासून लोकांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे. या पोस्टरवर आता नेटकाऱ्यानी भरभरून कमेंट्स करत पोस्टर आवडल्याची पोचपावती सर्वांना दिली आहे. देवदत्त नागेने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हे पोस्टर शेअर केले असून त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.
देवदत्त नागे हा मराठीमधील टॉपचा आणि लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसोबतच त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘तान्हाजी’ व ‘सत्यमेव जयते’ चित्रपटांतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. ‘आदिपुरुष’ चित्रपटातून देवदत्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीराम तर अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या आणि सैफ अली खान रावणाची भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार
‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…