मागील अनेक दिवसांपासून ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ विविध कारणांमुळे कमालीचा गाजत आहे. कधी सिनेमाच्या टीझरमुळे, कधी पोस्टरमुळे, कधी सिनेमावर होणाऱ्या टीकांमुळे हा सिनेमा सतत लाइमलाईट्मधे येत आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाच्या भव्य यशानंतर ओमच्या या आगामी सिनेमाची कमालीची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत आहे. सिनेमाला अनेकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सिनेमाच्या टीमने नेटाने याचा सामना केला. लवकरच अर्थात पुढच्या महिन्यात आदिपुरुष अखेर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. ९ मे रोजी या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित होणार होता, मात्र एक दिवस आधीच या सिनेमाचा ट्रेलर लीक झाला आहे.
ट्रेलर लीक झाल्यामुळे, ओम राऊत, प्रभाससोबतच निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. रामायणावर आधारित आलेल्या या सिनेमाची अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्यासाठीच ट्रेलर प्रदर्शित करण्याच्या एक दिवस आधी हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या मोजक्या आणि खास चाहत्यांसाठी ट्रेलरच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाच काहींनी हा ट्रेलर त्यांच्या मोबाइलवर शूट केला आणि इंटरनेटवर अपलोड केला आहे.
#AdipurushTrailer trailer is much better thn teaser.. Hindi mein atleast 200cr is confirmed ???? pic.twitter.com/DsMh55wT85
— Sumit (@Iamsrkknight) May 8, 2023
ज्या व्यक्तीने हा ट्रेलर शेअर केला आहे, त्याने सिनेमाचे खूप कौतुक करत हा चित्रपट नक्कीच २०० कोटींची कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान या २ मिनिट १४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आदी दिसत असून, राम शबरीची उष्टी बोरे खाताना, लक्ष्मणाला बरे करण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलताना आणि वानरं आणि रावणाच्या सैन्यामध्ये होणारे युद्ध देखील यात दिसत आहे. यात सैफ अर्थात रावण सर्वात शेवटी दाखवण्यात आला आहे.
या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-