Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड अदिती राव हैदरी वयाच्या 17व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट, आमिर खानसोबतही आहे खास नाते

अदिती राव हैदरी वयाच्या 17व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट, आमिर खानसोबतही आहे खास नाते

अभिनेत्री अदिती राव हैदरी ही ‘ये साली जिंदगी’, ‘पद्मावत’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटासाठी ओळखली जाते. अदितीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘श्रींगाराम’ या तमिळ चित्रपटातून केली होती. आदिती राव हैदरी ही एक नाही, तर दोन राजघराण्यातील आहे. आदितीचे एक आजोबा जे रामेश्वर राव हे वानापर्थी राज्याचे नेते होते, तर तिचे दुसरे आजोबा मुहम्मद सालेह अकबर हैदरी होते. दोघेही वडीलधारी आणि राजघराण्यातील होते. अदिती राव हैदरी 28 ऑक्टोबरला आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अदितीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील एहसान हैदरी आणि आई विद्या राव ती दोन वर्षांची असतानाच वेगळे झाले. ती म्हणाली की, “मला माझ्या आई आणि वडिलांचे आडनाव ठेवायचे होते. माझे पालनपोषण माझ्या आईने केले आहे, परंतु माझे वडील देखील माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत, म्हणून मी माझ्या नावापुढे राव आणि हैदरी ही दोन्ही आडनावे लावते.”

आमिर खानशी संबंध

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, अदितीचा बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानशी संबंध आहे. अदिती ही आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावची चुलत बहीण अर्थात त्याची साली होती. या नात्याने आमिर खान अदितीचा मेहुणा होता. अदितीने 2007 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते. ती सत्यदीपला 17 वर्षांची असताना भेटली आणि सत्यदीप तिचे पहिले प्रेम होते. 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केला होता मात्र आता ते वेगळे झाले आहेत.

जया बच्चन यांच्यामुळे ‘ही’ मिळाली भूमिका

अदितीने 2008 मध्ये ‘पद्मावत’ चित्रपटात अलाउद्दीन खिलजीच्या बेगम मेहरुन्निसा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अदितीच्या या छोट्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या भूमिकेसाठी तिची शिफारस खुद्द जया बच्चन यांनी केली होती. या सिनेमात भलेही तिची भूमिका छोटी होती, मात्र तिने या भूमिकेतून प्रेक्षकांच्यामानवर मोठी छाप सोडली.

अदिती अनाइता श्रॉफ अदजानियाच्या शोमध्ये सांगितले होते की, “ये साली जिंदगी चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान मला एका अभिनेत्याशी जवळीक साधण्याचे सांगण्यात आले होते. मला माहीत नसलेल्या व्यक्तीशी जवळीक साधण्यास सांगितले होते.”

अदिती आहे एक ट्रेंड भरतनाट्यम नृत्यांगना

अदिती ही एक उत्तम अभिनेत्रीसह एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. आदिती प्रसिद्ध नृत्यांगना लीला सॅमसन यांची शिष्य आहे.

अदितीने ‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने हिंदीसोबतच तामिळ, मल्याळम, तेलगू, मराठी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अदितीने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत. ‘पद्मावत’ चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा सर्वांनाच आवडली होती. याशिवाय ती ‘धोबी घाट’, ‘रॉकस्टार’, ‘लंडन पॅरिस न्यू यॉर्क’, ‘मर्डर ३’, ‘बॉस’, ‘खूबसूरत’, ‘वझीर’, ‘फितूर’, ‘भूमी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
कंगना राणौत सुब्रमण्यम स्वामींवर भडकली; म्हणाली, ‘महिला फक्त सेक्स करण्यासाठी नसतात, तर…’

प्रिया मराठे आकाशी घागरा-चोळीमध्ये दिसतेय फारच सुंदर; पाहा फोटो

हे देखील वाचा