Wednesday, July 3, 2024

‘आत्मचिंतन करण्यासाठी हा ब्रेक’ म्हणत आदित्य नारायणाने घेतला सोशल मीडियापासून मोठा ब्रेक

बॉलिवूडमधील प्रतिभावान गायक म्हणून आदित्य नारायणाला ओळखले जाते. एक उत्तम गायक असण्यासोबतच तो एक उत्तम सूत्रसंचालक देखील आहे. टेलिव्हिजन विश्वात आदित्यने अनेक मोठ्या मोठ्या शोचे खुमासदार सूत्रसंचालन करत लोकांना आपलेसे केले. मात्र आता याच आदित्यने एक निर्णय घेतला असून, त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या फॅन्सला खूपच वाईट वाटले आहे.

आदित्य नारायण सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. तो सतत या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात राहतो. मात्र आता त्याने याच सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरील सर्वच पोस्ट आणि व्हिडिओ डिलीट केले असून, एक पोस्ट शेअर करत आदित्यने असे करण्यामागील कारण सांगितले आहे.

आदित्य नारायणाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “सर्वात आधी कोणी काही विचार करेल अशा शुभचिंतकांना आणि फॅन्सला मी सांगू इच्छितो की मी एकदम ठीक आहे. मी आता एका डिजिटल ब्रेकवर आहे. आनंदाने माझी मुलगी, पत्नी, आई, वडील आणि इतर जवळच्या लोकांसोबत वेळ घालवत आहे. सोबतच माझा पहिलाच अल्बम असलेल्या ‘सांसें’च्या शेवटच्या भागातील काही गोष्टींवर काम करत आहे. मी माझ्या जुन्या पोस्ट यासाठी काढल्या की, मला पुन्हा नवीन सुरुवात करायची आहे. मी मागचे सर्व विसरून पुढे जाणार आहे, जसे की नव्या कॅनव्हासवर नवीन चित्र काढतात.”

आदित्यने त्याच्या पुढे लिहिले, “मला असे वाटते की आपण काही वेळेला ठरवून आयुष्यातील काही चालू गोष्टींपासून स्वतःला दूर केले पाहिजे. स्वतःसोबत वेळ घालवला पाहिजे आणि आत्मचिंतन केले पाहिजे. चांगले निरोगी शरीर तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही मानसिक रित्या निरोगी असाल. मला माझे शहरीक, मानसिक आणि अध्यात्मिक आयुष्य अतिशय निरोगी पाहिजे. आपण आपल्या खरी आयुष्यात जास्त वेळ घालवला पाहिजे नाकी डिजिटल जगात. कारण या डिजिटल जगाला काहींनी त्यांचे खरे जग बनून घेतले आहे. भेटू जुलै मध्ये.”

दरम्यान आदित्यने बालकलाकार म्हणून 100हून अधिक गाण्यांना आवाज दिला होता आणि पुरस्कारही जिंकले होते. आदित्यने अभिनयातही स्वतःला आजमावले आहे, मात्र तिथे त्याला जास्त यश मिळाले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा