‘लग्न’ म्हणजे प्रत्येक मुलामुलींच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस. या दिवसाची आठवण प्रत्येकाला अगदी आयुष्यभर राहते. लग्नातील प्रत्येक क्षण जणू कालच घडला आहे, असा लख्ख आठवत असतो. त्यातही जर तुमच्या लग्नात एखादा विचित्र प्रसंग घडला असेल तर मग विचारायलाच नको. असाच एक मजेशीर किस्सा सूत्रसंचालक आणि गायक आदित्य नारायणाच्या लग्नात देखील घडला.

लग्नानंतर दिलेल्या त्याच्या पहिल्याच मुलाखतीमध्ये त्याने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, ” लग्नाच्या दिवशी मी आणि श्वेता जयमाला साठी उभे होतो. तेव्हा भटजींनी आम्हाला एकमेकांना माला घालायला सांगितले. त्याचवेळेस श्वेताला तिच्या भावांनी उचलून घेतले. मलाही माझ्या मित्रांनी उचलले आणि तेव्हाच माझा पायजमा फाटला. एवढ्या पाहुण्यांसमोर असे झाल्याने, मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. आता ऐनवेळी काय करायचे हे आम्हाला सूचना नव्हते. त्याचवेळेस मला माझ्या मित्राने त्याचा पायजमा घालायला सांगितले. योगायोगाने त्याचा आणि माझा पायजमा एकाच रंगाचा असल्याने मला ही कल्पना आवडली आणि मी लगेच ती प्रत्यक्षात उतरवली. नंतर मी लग्नचे सर्व विधी माझ्या मित्राचा पायजमा घालूनच केले.”
आदित्यने याच मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याने अंधेरीमध्ये ५ खोल्यांचा एक फ्लॅट विकत घेतला आहे. त्याच्या आई वडिलांच्या घरापासून अगदी जवळच त्याने घर घेतले असून लवकरच तो आणि श्वेता तिकडे राहायला जाणार आहेत.
याच महिन्यात १ डिसेंबर रोजी आदित्यने त्याची मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत जुहूच्या इस्कॉन मंदिरात जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. त्याच्या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.