Monday, January 26, 2026
Home अन्य आदित्यची सटकली? लग्नाच्या पाचव्याच दिवशी श्वेताला माहेरी पाठविण्याची धमकी!

आदित्यची सटकली? लग्नाच्या पाचव्याच दिवशी श्वेताला माहेरी पाठविण्याची धमकी!

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि निवेदक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल हे १ तारखेला विवाहबद्ध झाले. या दोघांच्या लग्नात बॉलिवूडचे अनेक तारे तारका सहभागी झाले होते. सर्वांनी खूप सारी धमाल केली होती. विशेष म्हणजे लग्नाच्या पाचव्याच दिवशी आदित्यने पत्नी श्वेताला माहेरी पाठवण्याची धमकीचा देऊन टाकली.

झालंय असं की श्वेता आणि आदित्य हे लग्नानंतरच्या सर्व प्रथा पार पाडत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात आदित्यची आई आणि पत्नी श्वेता या स्वयंपाकघरात काहितरी पदार्थ बनवत आहेत. यावर आदित्य तिला पदार्थ चांगला न बनवल्यास सासरी पाठवून देइन असं म्हणताना दिसतोय. परंतु लागलीच त्याच्या ही चूक लक्षात आली आणि माहेरी पाठवून देईन असं म्हणत चूक सुधारली. हा व्हिडीओ खुद्द आदित्यनेच शूट केला होता.

आदित्यच्या या बोलण्यावर पत्नी श्वेता आणि घरातील इतर मंडळी जोरजोरात हसू लागली. आदित्यने देखील आपण डायलॉग विसरलो असल्याचं कबूल केलं. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला असून सध्या व्हायरल झाला आहे. आदित्य आणि श्वेता दोघांचेही चाहते या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. आदित्य किती नटखट आणि हजरजबाबी आहे हे तर आपण टिव्हीवरून अनेकदा पाहिलंच आहे. या दोघांच नातं हे असंच हसत खेळत पुढे जाओ असंच चाहत्यांना वाटतंय. कारण ‘ये बॉलिवूड है बाबा यहा कूच भी हो सक्त है।’

हे देखील वाचा