अभिनेता आदित्य सील ‘तुम बिन’ या चित्रपटात काम करुन प्रसिद्धीच्या झोतात आला. तो सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असतो. सध्या त्याच्या लग्नाविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपासूम आदित्य आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का रंजन लग्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, आदित्य आणि अनुष्का २१नोव्हेंबरला लग्न करणार आहे, असे म्हटले जात आहे.
माध्यमांशी बोलताना आदित्यला विचारण्यात आले की, तुझी लग्नाची तारीख कोणती आहे? यावर आदित्य माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “खरंच याबद्दल मला काहीच माहिती नाही. यावर मी सध्यातरी काही बोलू शकत नाही. परंतू वेळ आल्यावर सर्वात पहिले मी तुम्हाला याबद्दल सगळे सांगेल.” तसेच तो पुढे बोलताना म्हणाला की, “अद्यापही आम्ही लग्नाबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. यात लपवण्यासारखे आहे तरी काय? जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू.”
दरम्यान, आदित्यच्या महिला चाहतावर्ग प्रचंड आहे, जे त्याच्या लग्नाची बातमी ऐकून निराश होऊ शकतात. यावर आदित्य म्हणाला की, “अनुष्काने या घटनेनंतर सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने लिहिले की, “तो मुलगा आता सिंगल आहे. मी त्याला केव्हाच गुड बाय केले आहे. त्यामुळे सर्व मुलींनो तुम्ही त्याला मेसेज करू शकता.” आदित्य आणि अनुष्का साडेतीन वर्षींपुवी एका कौटुंबिक कार्यक्रमात भेटले होते. या दरम्यान दोघांमध्ये बर्याच गोष्टी घडल्या आहेत.
आदित्यविषयी बोलायचे झाले, तर आदित्यने २००२ मध्ये ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, ज्यात तो मनीषा कोयरालासोबत दिसला होता. आदित्य आता त्याच्या पुढच्या ‘रॉकेट गँग’ चित्रपटाच्या प्रीमिअरची तयारी करत आहे. बॉस्को लेस्ली मार्टिस दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत निकिता दत्ताही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’










