Wednesday, July 2, 2025
Home मराठी दु:खद! ‘उठा उठा दिवाळी आली…’, म्हणणाऱ्या ‘अलार्म काकां’चे निधन

दु:खद! ‘उठा उठा दिवाळी आली…’, म्हणणाऱ्या ‘अलार्म काकां’चे निधन

‘उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ आली.’ ही जाहिरात ऐकल्याशिवाय आपल्या सर्वांची दिवाळी पूर्ण होत नाही. ही मोती साबणाची जाहिरात खूप लोकप्रिय आहे. जाहिरात आणि जाहिरातीतील काका नेहमीच सर्वांच्या आठवणीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळे या जाहिरातीमधील डायलॉगसोबत जोडले गेलो आहोत. अशातच या जाहिरातीतील आपल्या डायलॉगने सगळ्यांचे मनोरंजन करणारे ‘अलार्म काका’ यांच्याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे.

या जाहिरातीत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. सोमवारी (२० सप्टेंबर) करमरकर यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

विद्याधर करमरकर यांनी अनेक मराठी तसेच हिंदीमधील काही चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले होते. ते खूप लोकप्रिय कलाकार होते. त्यांच्या निधनाबाबत अनेक कलाकारांनी आदरांजली अर्पण केली आहे. परंतु मोती साबणाच्या जाहिरातीने ते घराघरात पोहोचले होते. त्यांना जास्त ओळख या जाहिरातींमधून मिळाली. परंतु या दिवाळीत मात्र आपल्या सर्वांना काकांची कमतरता नक्कीच भासणार आहे. (Advertisement Actor Vidhyadhar karmarkar’s death, let’s know about him)

विद्याधर करमरकर यांना ‘आबा’ या नावाने देखील सर्वत्र ओळखतात. सुरुवातीला त्यांनी नोकरी करून त्यांची ही अभिनयाची आवड जोपासली होती. त्यांनी मोती साबण, इंडियन ऑईल, पेप्सी गोल्ड, टोमॅटो केचप, लिनोओ कॉम्पुटर यांसारख्या जाहिरातींमध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘दोस्ती यारिया मनमर्जिया’, ‘सास बहु और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक विलन’ या चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा