Tuesday, July 9, 2024

पांढरी दाढी आणि पगडी घातलेल्या व्यक्तीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल, जाणून घ्या काय आहे बिग बींशी संबंध?

बॉलिवूडचे शेहंशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत असतात. दरम्यान, नुकताच एक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते त्यातील व्यक्ती अमिताभ बच्चन असल्याचे समजत आहेत. खरं तर, व्हायरल होत असलेला हा फोटो, एका अफगाणी रिफ्यूजीचा खूप वर्षे जुना फोटो आहे. ज्याला अमिताभ बच्चन समजून नेटकरी गोंधळून गेले आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर स्टीव्ह मॅकक्यूरी याने हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करून, आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो इंटरनेटवर येताच हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्यक्तीला पाहून लोकांचा अमिताभ बच्चन यांची आठवण झाली. हा माणूस या फोटोत हुबेहुब बिग बींसारखा दिसत आहे. तसेच या फोटोवर नेटकरी भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (afghan refugee old photo went viral on internet)

इथे क्लिक करून पाहा फोटो

या फोटोमध्ये अफगाणी रिफ्यूजी डोक्यावर पगडी घातलेला दिसत असून, त्याचा एक डोळा लपलेला आहे. यासोबतच व्यक्तीच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा जाड चष्माही लावलेला आहे. तसेच चेहऱ्यावरचा रफनेस आणि पांढरी दाढी या व्यक्तीला अमिताभ बच्चनचा लूक देत आहे. हा फोटो आजचा नाही, तर २०१८ सालचा आहे, जो त्यावेळीही चर्चेत आला होता.

त्यावेळी जेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता, तेव्हा लोक म्हणू लागले होते, की हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवरील आहे. त्याचवेळी, आता पुन्हा एकदा हा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून काहीजण याला अमिताभ बच्चन म्हणत आहेत, तर काहींनी हा अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाचा लूक असल्याचे म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा