‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक आणि पंजाबी गायिका अफसाना खान तिचा बॉयफ्रेंड साजसोबत लग्नबंधनात अडकली आहे. अफसाना आणि साजने १९ फेब्रुवारी रोजी लग्न केले होते. त्यांच्या लग्नात त्यांच्या घरातील काही व्यक्ती आणि जवळचे मित्र सामील झाले होते. त्यांनी त्यांच्या लग्नात खूप मस्ती केली. अशातच त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नानंतर अफसाना खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या लग्नाचे, रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असते. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तिने सिंदुर लावलेला दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर युजर्स भडकले आहेत. तसेच तिला अनेकजण खडेबोल सुनावत आहेत.
अफसानाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अफसाना तिचा पती साजसोबत स्टेजवर एन्ट्री घेताना दिसत आहे. यावेळी अफसानाने लाल रंगाचा लहंगा घातला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. तिने ज्वेलरी आणि मेकअपसोबत सिंदुर लावला आहे. तिचा हा लूक अनेकांना आवडला आहे. ते अनेकजण हा लूक पाहून हैराण झाले आहेत. तसेच अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.
अफसानाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण तिची मस्करी करत आहेत. तसेच अनेकांनी तिला खडेबोल सुनावले. तसेच अनेकजण तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करत आहेत. एकाने लिहिले आहे की, “तुम्ही सिंदुर का लावला आहे?” आणखी एकाने लिहिले आहे की, “तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू? नाव मुस्लिम आणि सगळी कामं हिंदूंचे. अल्लाह कसे लोक आहेत हा जगात.” आणखी एका युजरने लिहिले आहे की, “तुला जरा लाज वाटली पाहिजे.” अशाप्रकारे तिला ट्रोल करत आहेत.
यावेळी अफसानाचे चाहते तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “हिंदू लोक लग्न केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच सिंदुर लावणे बंद करतात पण अफसाना हे दररोज करते.” बाकी अनेकजण तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. अनेकजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.
अफसानाला बिग बॉस १५ मधून खूप लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये चुकीचे वर्तन केल्यामुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले होते. या शोमध्ये असलेले अनेक स्पर्धक तिच्या लग्नात आले होते.
हेही वाचा :
- लेखक जयप्रकाश चौकसे यांचा ८२ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू, सोशल मीडियावर वाहिली जातीये श्रद्धांजली
- आपल्या हलक्या फुलक्या विनोदाने सगळ्यांना हसवणाऱ्या जसपाल भट्टी यांनी केले होते ‘फ्लॉप शो’मध्ये काम
- यूएसमधील शिक्षण सोडून श्रद्धाने धरली मुंबईची वाट, पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरफ्लॉप, वाचा अभिनेत्रीचा अभिनयप्रवास