दिवाळी तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा आपल्या देशातील सर्वात मोठा सण. या सणासाठी घरातील व्यक्तींसोबतच घर देखील चमकू लागते. खाद्यपदार्थांची लयलूट, फटाक्यांची आतिषबाजी, प्रसन्न आणि मोहक वातावरण असलेला दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद देतो. दिवाळीला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात जर दिवाळी लग्नानंतर पहिल्यांदा आली असेल तर त्याची मजा काही औरच असते.
दिवाळी आपण कशी साजरी करतो, दिवाळीची महत्व, दिवाळीची खरी मजा ही लग्नानंतर येते. आपल्याकडे लग्नानंतर पहिला दिवाळी सण साजरा केला जातो. लग्नानंतर येणारी पहिली दिवाळी म्हणजे एक वेगळीच गंमत आणि मजा असते. त्यामुळे नवीन जोडपे या सणाची तयारी देखील खास पद्धतीने करतात. याला अभिनेत्री देखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती हाताला मेहेंदी काढताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, ‘पहिल्या दिवाळीची तयारी.’
सोनालीने याचवर्षी दुबईस्थित कुणाल बेनोडकरशी लग्न केले. त्यामुळे ही दिवाळी सोनालीची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. त्यासाठी तिने खास प्लॅनिंग देखील केले आहे. दिवाळीसाठी सोनाली भारतात आली असून, तिने तिच्या हातावर मेहेंदी काढली आहे. सोनालीची ही दिवाळी आणि पाडवा जोरदार साजरा होणार यात शंका नाही. सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार आणि तिचे फॅन्स कमेंट्स करून तिला दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
सोनालीच्या कामाबद्दल संगाचे झाल्यास, तिने मराठी आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिला खरी ओळख रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ सिनेमातून मिळाली. या सिनेमाने तिला तिच्या ओळखीसह ‘अप्सरा’ हे नवीन नाव देखील दिले. अगदी या नावाला साजेसे सौंदर्य असणारी सोनाली नृत्यातही पारंगत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?
-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी