Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नावर ‘या’ तिसऱ्याच व्यक्तीने केले शिक्कामोर्तब?, व्हिडिओ वायरल

बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठे कलाकार बोहल्यावर चढत आहे. २०२२ मध्ये तर आलिया भट्ट रणबीर कपूर, फरहान अख्तर शिबानी दांडेकर, मौनी रॉय आदी दिग्गज कलाकारांनी लगीनगाठ बांधली. आता यावर्षी देखील एक लोकप्रिय आणि चर्चेत असलेले कपल लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. ते कपल आहे स्टार अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी.

मागील अनेक काळापासून किंबहुना ‘शेरशहा’नंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाना चांगलाच बहर आला. त्यांच्या नात्याच्या बातम्यांसोबतच आता तर त्यांच्या लग्नाच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी हे दोघं स्टार कपल लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या लग्नाच्या व्हेन्यूसोबतच इतरही अनेक बातम्या ऐकू येत आहे. अशातच आता अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून खरंच सिद्धार्थ आणि कियारा लग्न करणार हे लक्षात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aarti Khetarpal (@iaartikhetarpal)

झाले असे की, सिद्धार्थ मल्होत्रा त्यांची मैत्रीण असलेल्या मॉडेल, अभिनेत्री आरती खेत्रीपालच्या भावाच्या लग्नात सहभागी झाला होता. दिल्लीमध्ये आयोजित या लग्नामध्ये सिद्धार्थ देखील मस्तीच्या मूडमध्ये दिसला. सध्या या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्याच एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची हिंट फॅन्सला मिळाली. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ स्टेजवर उभा असलेला दिसत असून, त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा राहून म्हणतो की, दिल्लीचा मुलगा जो जगात सर्वात हॉट आहे, लवकरच त्याचे देखील लग्न होणार आहे. हे ऐकून सिद्धार्थ लाजतो आणि मागे सरकतो.

प्राप्त होणाऱ्या माहिती नुसार सिद्धार्थ आणि कियारा पुढच्या अर्थात फेब्रुवारीमध्ये लग्न करू शकतात. त्यांचे लग्न ४ त ६ फेब्रुवारी दरम्यान भारतामध्येच होणार असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नाला जवळच्याच लोकांना आमंत्रण असणार आहे. मात्र याबाबत अजूनही कोणीच अधिकृत माहिती दिलेली नाही. जवळपास ते दोघे चार वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

हे देखील वाचा