ग्लॅमरने भरलेल्या कलाविश्वात कदाचित कोण जास्त बोल्ड आहे याचीच शर्यत रंगलेली पाहायला मिळतेय. अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या आगळ्यावेगळ्या बोल्ड फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधत असते. मात्र, आता बोल्डनेसमध्ये जवळपास सर्वच अभिनेत्री एक पाऊल पुढे निघाल्या आहेत. आता उर्फीलाही टक्कर देत एका अभिनेत्रीने आपल्या बोल्डनेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्या टॉपलेस फोटोशूटने प्रेरित होऊन एका अभिनेत्रीनेही बोल्ड फोटोशूट केले आहे.
सध्या माध्यमांचे लक्ष वेधून घेणारी ही अभिनेत्री इतर कुणी नसून निकिता रावल (Nikita Rawal) आहे. निकिता तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे असे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती पानांच्या मागे हटके पोझ देताना दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्या फोटोशूटची आठवण झाली आहे.
खरं तर, कियारानेही मागील वर्षी असेच एक फोटोशूट केले होते. कियाराला या लूकमध्ये पाहून तिच्या चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. कियाराचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडर शूटसाठी करण्यात आले होते. या फोटोशूटसाठी कियाराला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.
आता निकिता रावल ही तिचे उघडे शरीर घेऊन दोन पानांच्या मागे थांबलेली दिसत आहे. निकिताने यापूर्वीही तिच्या बोल्ड लूकमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. निकिता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिला सोशल मीडियावर भरपूर फॉलोव्हर्स आहेत. तिला इंस्टाग्रामवर 8 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. ती त्यावर दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
निकिताने अनेक जाहिरातींसाठीही फोटोशूट केले आहे. त्याचे फोटोही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत असतो. निकिताने अनेक मॅगझिनची कव्हर गर्ल म्हणूनही आपले फोटो शेअर केले आहेत. एका मॅगझिनसाठी तिने डेनिमसोबत शरीराच्या वरच्या भागात पूर्ण पाना-फुलांना टॉप म्हणून वापरत फोटोशूट केले आहे.
निकिताचे सिनेमे
निकिताने ‘गरम मसाला’ आणि ‘अम्मा की बोली’ यांसारख्या सिनेमात झळकली होती. यानंतर निकिताने अनेक सिनेमात आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये मुख्य अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
आलिशान आयुष्याला लाथ मारत प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, झोपडीत काढतेय दिवस
‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’