Wednesday, July 3, 2024

प्रेग्नेंट आलिया-रणबीरला ‘कंडोम’ कंपनीने दिल्या ‘नादखुळ्या शुभेच्छा’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt)  नुकतीच सोशल मीडियावरुन ती आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. या बातमीनंतर हिंदी सिने जगतातील अनेकांनी आलिया रणबीरला शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावरुन अनेक कलाकारांनी आलियाला खास गिफ्टही दिले होते. तसेच सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु सध्या आलिया रणबीरला एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा सर्वत्र चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काय आहेत त्या शुभेच्छा जाणून घेऊया. 

अभिनेत्री आलिया भट्टने 27 जून रोजी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ‘आमचे बाळ… लवकरच येत आहे.’ अशी गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली होती.  यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आलियाचे अभिनंदन करत आहे. दरम्यान, कंडोम कंपनी ड्युरेक्सने इंस्टाग्रामवर आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करणारी पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये ‘मेहफिल में तेरी, हम तो साफ नही थे’ असे लिहिले आहे, आता ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘तुम्ही खूप दुःखी आहात असे दिसते’, याशिवाय अनेक यूजर्सने या पोस्टवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत, ज्या पोस्टसोबतच व्हायरल होत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

 

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या प्रेमप्रकरणाची बराच काळ चर्चा सुरू होती. या चर्चांना पुर्णविराम देत रणबीर आणि आलियाने लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने रणबीर आलियाच्या चाहत्यांसह अनेकांना सुखद धक्का बसला होता. १४ एप्रिलला रणबीर आलियाचा हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला सिने जगतातील अनेक दिग्गज कलाकारांंनी हजेरी लावली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आलिया आणि रणबीर लवकरच ब्रम्हास्त्र चित्रपटात एकत्रित झळकणार आहेत.

हे देखील वाचा