Wednesday, September 18, 2024
Home बॉलीवूड डिसेम्बर मध्ये ‘द रोशन्स’ नावाची डॉक्युमेंटरी सिरीज येणार; रोशन कुटुंबियांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेतला जाणार…

डिसेम्बर मध्ये ‘द रोशन्स’ नावाची डॉक्युमेंटरी सिरीज येणार; रोशन कुटुंबियांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेतला जाणार…

अलीकडे, सलीम-जावेद या प्रसिद्ध लेखक जोडीवर आधारित अँग्री यंग मॅन ही डॉक्युमेण्टरी मालिका खूप गाजली. त्यामुळे प्रेक्षकांना या दोघांबद्दल जाणून घेता आले. आता बातमी येत आहे की, रोशन कुटुंबावर बनलेली डॉक्युमेण्टरी सिरीजही यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोशन कुटुंबाचा वारसा यामध्ये पाहायला मिळणार आहे.

हृतिकचे काका राजेश रोशन यांनी त्याच्या कुटुंबावर डॉक्युमेंट्री बनवण्याचा निर्णय घेतला. हि मालिका डिसेंबर २०२४ मध्ये OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज केली जाऊ शकते. ‘द रोशन्स ‘ नावाची ही डॉक्युमेंटरी सीरिज असेल. या माध्यमातून रोशन कुटुंबातील सर्व कलाकारांची कहाणी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

रोशन कुटुंब दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. हृतिक रोशनचे आजोबा रोशन लाल नागरथ हे प्रसिद्ध संगीतकार होते. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनयातून केली आणि नंतर ते यशस्वी दिग्दर्शक बनले. हृतिकचे काका राजेश रोशन हे देखील प्रसिद्ध संगीतकार आहेत. रिपोर्टनुसार, ‘द रोशन’मध्ये अनेक बॉलिवूड कलाकार या कुटुंबाबद्दल काही माहिती देताना दिसणार आहेत. यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राचाही समावेश आहे.

‘द रोशन’चे दिग्दर्शन शशी रंजन यांनी केले आहे. रोशन कुटुंबाविषयी अधिक बोलायचे झाल्यास, हृतिकचे आजोबा रोशन लाल नागरथ १९४७ मध्ये मुंबईत आले, जिथे त्यांनी ५० आणि ६० च्या दशकात संगीताच्या जगात आपला ठसा उमटवला. यानंतर येणाऱ्या पिढ्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती आणि संगीत क्षेत्रात यश संपादन केले.

हृतिक रोशन सध्या त्याचा नवीन चित्रपट वॉर २ मध्ये व्यस्त आहे. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे, ज्याने रणबीर कपूरसोबत ये जवानी है दिवानी आणि वेक अप सिड देखील बनवले आहेत. मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत हृतिक रोशनला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. वॉर २ मध्ये कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार अभिनेता पवन कल्याण; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा