Tuesday, July 9, 2024

ब्रेकअपच्या तब्बल दोन दशकानंतर पहिल्यांदाच ‘ही’ जोडी आली एकत्र, सगळ्यांसमोर मिठी मारत…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्या काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या, मात्र नंतर त्यांचे नाते तुटले. परंतु तरीही त्या चांगले मित्र म्हणून पुढे कायम राहिल्या. अशी उदाहरणं जास्त नसली तरी आहेत. काही जोड्या त्यांचे नाते तुटल्यानंतर अनेक वर्षांनी सोबत दिसल्या आहेत. असेच एका जोडीच्या बाबतीत झाले आहे. ९० च्या दशकात ज्या जोडीने सर्वानाच वेड लावले होते, ज्या जोडीच्याच सगळीकडे चर्चा होत्या ती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची. या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट मिळवले आणि प्रसिद्धीत आले. आज यांच्या ब्रेकअपला मोठा काळ झाला आहे. अनेकदा त्यांच्या फॅन्सने त्यांना एकत्र बघण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र असे काही झाले नाही. पण आता एका कार्यक्रमामध्ये हे दोघं एकाच स्टेजवर सोबत उभे दिसले.

अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे ‘मोस्ट स्टायलिश पुरस्कार 2023’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे आणि खास करून अक्षय रवीनाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पुरस्कारादरम्यान अक्षय आणि रवीना यांनी स्टेजवर येत एकमेकांना मिठी देखील मारली. अक्षय कुमारला ‘मोस्ट स्टायलिश मॅन २०२३’ चा पुरस्कार देण्यात आला आणि तो देण्यासाठी रवीना टंडन स्टेजवर आली. अक्षय पुरस्कार घेण्यासाठी आल्यावर दोघांनी मिठी मारली आणि मग रवीनाने अक्षय कुमारला हा पुरस्कार प्रदान केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar???? (@jr_khiladi_sandip)

दरम्यान या दोघांच्या एकत्र येण्यामुळे त्यांचे फॅन्स नक्कीच खुश झाले असतील. अक्षय आणि रवीना हे ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर १९९५ मध्ये त्यांच्या डेटींगच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. साखरपुडा केल्याचे देखील सांगितले गेले. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अक्षयची रेखा यांच्याशी जवळीक वाढल्याच्या चर्चा येऊ लागल्या आणि रवीनाला हे पटत नव्हते. अखेर त्यांचे ब्रेकअप झाले आणि रवीना, अक्षय कधीही एकत्र दिसले नाहीत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट

हे देखील वाचा