नुकताच सुरू झालेल्या कलर्स चॅनलवरील ‘बिग बॉस सीझन १५’चा हा पहिलाच आठवडा आहे . यावेळेस बिग बॉसच्या घरात जंगलची थीम आहे. यांमध्ये घर दोन गटामध्ये विभागलेले आहे. यात जे ‘बिग बॉस ओटीटी’मधून आले आहेत त्यांना डायरेक्ट घरात राहण्यासाठी एंट्री मिळाली आहे. तर नवीन स्पर्धकांना जंगलमध्ये ठेवले गेले आहे. एकीकडे शमीता, निशांत आणि प्रतीक आहे. तर दुसरीकडे इतर स्पर्धक आहेत. त्यामुळे घरात चांगलाच गोंधळ झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोमध्ये घरात बरीच भांडणं पाहायला मिळाली आहे. भांडण झाल्यानंतर करण कुंद्रा शमिता शेट्टीला ‘आंटी’ असे म्हणाला.
मंगळवारच्या एका एपिसोडमध्ये जय भानुशाली आणि प्रतीक सेहजपाल यांच्यात टास्क दरम्यान बातचीत झाली. बातचीत दरमान्य प्रतीकने जयची कॉलर पकडली. त्यामुळे जय खूप चिडला. जयने शिवीगाळ देखील केली. यानंतर दुसरीकडे शमिता शेट्टी आणि करण कुंद्राचे भांडण सुरू झाले. यावेळी शमिता करणला क्लासलेस म्हणाली. टास्कच्या दरम्यान जंगलवाल्यांनी खूप गोंधळ घातला होता. त्यामुळे शमिताने क्लासलेस हा शब्द वापरला होता. ही गोष्ट जेव्हा करणला कळाली, करणेही चिडला. यानंतर जय आणि निशांत सोबत बोलताना करण म्हणाला की, “आम्ही स्व:ताच्या पायावर उभे आहोत आणि त्या आंटीला सांग यापुढे क्लास व्लास नाही बोलायचं.”
या गोष्टीमुळे सोशल मीडियावर करण कुंद्रा चांगलाच ट्रोल झाला आहे. करणच्या या स्टेटमेंटवर शमिताची आई सुनंदा शेट्टी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी ट्वीट केले की, “करण कुंद्राला शमिता कोणत्या अँगलने आंटीसारखी दिसते?” शिवाय सुनंदा शेट्टी यांनी शोचा होस्ट सलमान खानला वीकेंड का वारमध्ये करण कुंद्राच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले. ट्वीटमध्ये शमिताची आई सुनंदा शेट्टींनी सलमान खानला टॅग देखील केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस