Saturday, January 31, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजनंतर आता ‘धुरंधर 2’च्या टीझरची उत्सुकता; या दिवशी कथेची पहिली झलक येण्याची शक्यता

‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजनंतर आता ‘धुरंधर 2’च्या टीझरची उत्सुकता; या दिवशी कथेची पहिली झलक येण्याची शक्यता

रणवीर सिंग अभिनीत आणि आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवले होते. सनी देओल यांच्या ‘बॉर्डर 2’सारख्या मोठ्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही ‘धुरंधर’ने आपली पकड कायम ठेवली होती. त्यामुळेच आता प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने ‘धुरंधर 2’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक नव्या अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढत आहे. दरम्यान, आता ‘धुरंधर 2’च्या टीझरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

31 जानेवारीला टीझर रिलीज होण्याची शक्यता – रेडिटवरील एका पोस्टनुसार दिग्दर्शक आदित्य धर ‘धुरंधर 2’चा टीझर 31 जानेवारी रोजी रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची कथा जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने या पोस्टमध्ये काही महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. पहिल्या भागात अक्षय खन्ना यांच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवण्यात आला होता, तर दुसऱ्या भागात अर्जुन रामपाल मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रेडिट पोस्टमध्ये म्हटले आहे की, “धुरंधर 2 (Dhurandhar 2)चा टीझर प्रचंड चर्चेत आहे. ज्यांनी तो पाहिला आहे, त्यांचे म्हणणे आहे की रणवीर सिंगने जबरदस्त अभिनय केला आहे. तो अधिक आक्रमक, बेधडक आणि ऊर्जेने भरलेला दिसतो. देशाचा मुलगा म्हणून दाखवलेली त्याची बॅकस्टोरी कथेला अधिक ताकद देते. अक्षय खन्नाचा रहमान हा खलनायक मृत्यूमुखी पडतो, तर अर्जुन रामपालचा पात्र पुढील प्रमुख खलनायक म्हणून रणवीरसमोर उभा राहतो. रणवीरच्या व्यक्तिरेखेत दिसणारे सूक्ष्म बदल आणि तीव्रता प्रेक्षकांना थक्क करणारी आहे.”

या साउथ चित्रपटाशी होणार टक्कर – ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर थेट सामना यश अभिनीत ‘टॉक्सिक’ या साउथ चित्रपटाशी होणार आहे. दोन्ही चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहेत. याआधी सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’ची रिलीज डेट पुढे ढकलली जाईल का, अशी चर्चा होती. मात्र आदित्य धर यांनी स्पष्ट केले आहे की चित्रपटाची तारीख बदलण्यात येणार नाही आणि 19 मार्चलाच ‘धुरंधर 2’ प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

मर्दानी 3 बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1: पहिल्याच दिवशी राणी मुखर्जीची जादू? चित्रपटाला भरभरून दाद, इतक्या कोटींची झाली कमाई

हे देखील वाचा