Tuesday, June 10, 2025
Home अन्य कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या किरण खेर पुन्हा कामावर परतण्यासाठी सज्ज, ‘या’ शोमधून करणार कमबॅक

कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या किरण खेर पुन्हा कामावर परतण्यासाठी सज्ज, ‘या’ शोमधून करणार कमबॅक

मनोरंजन क्षेत्रासाठी नेहमीच एक वाक्य म्हटले जाते आणि ते म्हणजे ‘द शो मस्ट गो ऑन.’ खरंतर हे वाक्य फक्त मनोरंजन क्षेत्र नाही तर सर्वच क्षेत्रांना लागू होणारे आहे. पण त्यातही या क्षेत्रासाठी हे वाक्य जास्त वापरले जाते. कलाकरांना त्यांच्या कामासाठी अनेकदा किंबहुना नेहमीच वैयक्तिक आयुष्य बाजूला सारून कामाला प्राधान्य द्यावे लागते. कलाकार आजारी जरी असले तरी काही काळापुरता ब्रेक घेऊन पुन्हा ते त्यांच्या कामावर परततात. अभिनेत्री आणि खासदार किरण खेर देखील मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कामावर परतल्या आहेत. कॅन्सरवर यशस्वी मात करून किरण खेर लवकरच प्रेक्षकांचं समोर येणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच किरण खेर कॅन्सरग्रस्त असल्याचे सर्वांना समजले होते. त्यानंतर अनेक महिने त्या कॅन्सरवर उपचार घेत होत्या. मात्र आता पुन्हा त्या त्यांच्या कामावर येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काही महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर किरण टेलिव्हिजन विश्वात परीक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. टीव्ही क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे परीक्षण करताना दिसणार आहेत.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे परीक्षण सुरूवातीपासूनच किरण खेर करत आल्या आहेत. आता पुन्हा त्यांना त्यांच्या याच भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून हा शो कधी सुरू होईल याचीच ते वाट बघत आहेत. एका मोठ्या वेबसाईटशी बोलताना किरण खेर यांनी या शोबद्दल सांगितले की, “इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो माझ्यासाठी खूपच खास आणि हृदयाच्या जवळ आहे. मागील ९ वर्षांपासून मी या शोचे परीक्षण करत आहे. हा अनुभव मला खूपच समाधान देणारा आहे. आता मला असे वाटत आहे, की मी माझ्या घरी परतत आहे. संपूर्ण देशातील लोकांमध्ये असणारी प्रतिभा एकाच मंचावर आणण्यासाठी हा शो ओळखला जातो. नेहमीच या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमधील प्रतिभा पाहून मी अवाक असते.”

किरण यांच्यासोबतच शिल्पा शेट्टी आणि रॅपर बादशहा हा शो जज करताना दिसणार आहे. तत्पूर्वी एप्रिल २०२१ मध्ये अनुपम खेर यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती एका सोशल
मीडिया पोस्टमधून दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा