टॉलिवूड स्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) बॉलिवूडमध्येही कमी लोकप्रिय नाही. मात्र, त्याचा ‘लायगरर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. हा चित्रपट गेल्या महिन्यातच प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर चित्रपट आणि चित्रपटाची स्टारकास्ट वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल झाली. आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी विजय देवरकोंडा यांच्यावर निशाणा साधताना चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण दिले आहे. काय म्हणाले ते नेमके चला जाणून घेऊ.
विजय देवरकोंडा हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा लायगर चित्रपट मात्र सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टिका झाली होती. आता बॉलिवूड निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही हा चित्रपट फ्लॉप ठरण्यास विजय देवरकोंडाच कारणीभूत असल्याचे म्हणले आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, राम गोपाल वर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाबाबत वक्तव्य केले आहे. चित्रपट निर्मात्याने सांगितले- लायगरच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाच्या आक्रमक विधानांचा चित्रपटावर नकारात्मक परिणाम झाला. अल्लू अर्जुन, प्रभास, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांसारख्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील इतर स्टार्सप्रमाणे विजय देवरकोंडा हिंदी प्रेक्षकांना प्रभावित करू शकले नाहीत. विजयच्या उद्धट वागण्यामुळे प्रेक्षकांनी ‘लायगर’ला प्रेम दिले नाही.
विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. ज्यामध्ये अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटाकडून निर्मात्यांना तसेच प्रेक्षकांच्याही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘लिगर’ला प्रेक्षकांनी नाकारले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘लिगर’ची कमकुवत कथा आणि विजय देवरकोंडाच्या वक्तव्यामुळे हा चित्रपट हिट होऊ शकला नाही.
हेही वाचा- कोणाला जाड म्हणून हिणवले तर कोणाला शो मधून हाकलले, ‘या’ अभिनेत्रींना करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना
साडीत खुलले नोराचे सौंदर्य
बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा, आत्तापर्यंत ‘या’ चित्रपटांना बसला बॉयकॉटचा फटका