साल २०१७ मध्ये आलेला ‘आयटमगिरी’ चित्रपट चांगलाच पसंत केला गेला. यातील राजेश्वरी खरात, हंसराज जगताप, छाया कदम आणि मिलींद शिंदे यांच्या भुमिका विशेष गाजल्या. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता ‘तिरसाट’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून, येत्या २० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून, चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केलं आहे. नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो, या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.
चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज पवार (Neeraj Pawar) आणि तेजस्विनी शिर्के (Tejaswini Shirke) ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. रिफ्रेशिंग अशा या पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा