बॉलिवूड कलाकार त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. आलिया भट्ट ही तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, यादरम्यान तिने असे काही विधान केले आहे, ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नेपोटिझमवर केलेल्या वक्तव्यामुळे आलिया टीकेची धनी ठरत आहे.
सिनेमाशी संबंध असणाऱ्या कुटुंबात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा जन्म झाला आहे. त्यामुळे ती नेहमीच टीकाकारांच्या निशाण्यावर असते. नेपोटिझमच्या चर्चांवर आणि ट्रोलिंगबद्दल वक्तव्य करताना आलियाने तिचे मत मांडले. यामुळे आता तिला जोरदार ट्रोल केले जात आहे.
माध्यमांशी बोलताना आलिया म्हणाली की, जर कुणाला तिचे सिनेमे आवडत नसतील, तर ते न पाहण्याचा निर्णय त्यांच्या हातात आहे. ती म्हणाली, “तर, शेवटी कोण मजा करत आहे? निदान मी माझा पुढचा फ्लॉप देईपर्यंत? आतासाठी, मी हसत आहे! दिवसाच्या शेवटी, आपल्या कामाचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करा. मी स्वतःचा तोंडी बचाव करू शकत नाही, आणि जर तुम्हाला मी आवडत नसेल, तर मला पाहू नका.”
Alia Bhatt : If u don't like me don't watch me I can't help it
We will all fulfill her wish too
Let's make #Brahmastra 500Cr FLOPBUSTER
We are just tickets buyers for them. They only need your money not you. #BoycottBrahmastra #BoycottBollywood pic.twitter.com/IJ8u9NWxXy
— Nitika Singh???????????? (@itsNitikaSingh) August 22, 2022
“मी यामध्ये काहीही मदत करू शकत नाही. हे असे आहे, ज्यात काहीही करू शकत नाही. लोकांकडे बोलण्यासाठी काही आहे. अपेक्षा आहे, मी माझ्या सिनेमासोबत त्यांना सिद्ध करून दाखवेल की, मी वास्तवात त्या स्थानासाठी लायक आहे, ज्यावर मी ताबा घेते,” असे पुढे बोलताना आलिया म्हणाली. या वक्तव्यानंतर आलिया पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. नेटिझन्स तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाबद्दल ट्वीट करत आहेत. तसेच, दुसऱ्यांनाही हा सिनेमा पाहू नका सांगत आहेत.
काही नेटकरी आलियाच्या या वक्तव्यामुळे तिला अभिमानी म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, “जर तुम्हाला मी आवडत नसेल, तर मला पाहू नका- आलिया भट्टने तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हे म्हटले. आता प्रेक्षक ठरवतील त्यांना काय पाहायचंय.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सांगण्याची गरज नाहीये, काय पाहायचं आणि काय नाही. फक्त अहंकार. या इंडस्ट्रीवर बहिष्कार टाकण्यासाठी असणाऱ्या कारणांपैकी एक.”
आता आलिया भट्टच्या वक्तव्यानंतर नेटकरी तिच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर सोडणार भारत, पुढील आयुष्य घालवणार ‘या’ देशात?
‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली
क्या बात है! घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या, खूपच खास आहे कारण