Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर विकी कौशलने कॅटरिना कैफला दिले वचन, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यानंतर विकी कौशलने कॅटरिना कैफला दिले वचन, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

असे म्हणतात की प्रेम जर खरे असेल, तर आयुष्यात कोणतीही अडचण येत नाही आणि दोघांना जोडण्यात ब्रह्मांडही सामील होते. बॉलिवूडच्या क्युट जोडपे विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लव्हस्टोरीबद्दल लोक अजूनही अनभिज्ञ आहेत. पण दोघांची लव्हस्टोरी अगदी खरी आहे आणि ती सोशल मीडियावरील पोस्ट आणि दोघांच्या बॉन्डिंगवरून स्पष्टपणे दिसून येते. विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नाला रविवारी (९ जानेवारी) एक महिना पूर्ण झाला आहे. या दिवशीच राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न करून दोघांनीही आपल्या नात्याला नवे नाव दिले आहे. कॅटरिनानंतर विकीने आपल्या सुंदर पत्नीसोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे आणि एक खास वचनही दिले आहे.

विकी कौशलने लेडी लव्हचा न पाहिलेला फोटो केला शेअर

विकी (Vicky Kaushal) आणि कॅटरिनाने (Katrina Kaif) त्यांच्या लग्नानंतर, फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना संगीत, मेहंदी आणि लग्नाचे आनंदाचे क्षण पाहायला लावले. आज दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला असताना विकीने एक न पाहिलेला फोटो शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. त्याने कॅटरिनासोबत शेअर केलेला फोटो, ज्यामध्ये दोघेही पारंपरिक अवतारात दिसत आहेत.

विकीने कॅटरिनाला दिले वचन

कॅटरिनाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, तर विकी काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना विकीने लिहिले की, “फॉरेव्हर टू गो.”

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव 

सोशल मीडियावर कॅटरिनानंतर विकीची ही पोस्ट कलाकार आणि त्यांचे चाहतेही पसंत करत आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत, दोघांचे प्रेम असेच वाढत राहो हीच प्रार्थना ते एकत्र करत आहेत.

कॅटरिनानेही शेअर केली पोस्ट

कॅटरिनाने हा खास क्षण पती विकी कौशलसोबत खास पद्धतीने साजरा केला आहे. तिने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅटरिना तिच्या पतीच्या मिठीत दिसत आहे. फोटो पोस्ट करत कॅटरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक महिना पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन, माय लव्ह.”

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल दोघेही वैवाहिक जीवनात खुश असल्याचे त्यांच्या पोस्टमधून दिसत आहे. हे जोडपे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. विकी आणि कॅटरिना दोघेही त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

हेही वाचा  :

हे देखील वाचा