Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

केदारनाथनंतर अक्षय कुमार पोहोचला बद्रीनाथला, ‘अशा’ प्रकरा केले चाहत्यांचे अभिवादन

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी केदारनाथ मंदिरात गेला होता, जेथून त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. यानंतर, रविवारी (दि. 28 मे)ला अभिनेता बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला हाेता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेता कपाळावर चंदनाचा टिळक लावून कडेकोट बंदोबस्तात मंदिरात प्रवेश करत आहे. यादरम्यान, अभिनेत्याच्या आजूबाजूला माेठी सुरक्षा  देखील दिसत आहे.

अक्षय कुमार (akshay kumar) सध्या धार्मिक यात्रा करत आहे. दरम्यान, आता अभिनेत्याचे बद्रीनाथमधील काही फाेटाे समोर आले आहेत. खरे तर, अक्षय कुमार 28 मे रोजी भगवान बद्रीनाथला पोहोचला होता. यावेळी त्याच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षाव्यवस्था हाेती. अभिनेत्याने दर्शनाला जाण्यासाठी ब्लॅक ऑऊटफिट परिधान केले असून  काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होता. यासोबतच अभिनेत्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळही दिसत आहे. इतकचे नव्हे तर, अक्षयने कपाळावर चंदनाचा टिळकही लावला आहे.

अक्षयच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याला या लूकमध्ये पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेले काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही अक्षयकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अशात अभिनेता सध्या सोनाक्षी सिन्हा आणि टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात काम करत आहे. याशिवाय तो ‘ओह माय गॉडमध्ये’ही दिसणार आहे. ‘सोरारई पोटरु’च्या हिंदी रिमेकमध्येही अक्षयच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात तो राधिका मदनसोबत दिसणार आहे.(after kedarnath bollywood actor akshay kumar reached badrinath temple in heavy security see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिशा परमारने प्रेग्नेंसी फोटोशूट चाहत्यांसह केले शेअर, व्हिडिओमध्ये राहुल वैद्य आनंदाने दिसला नाचताना

साधी – भोळी टीना दत्ता बनलीय बोल्ड; मिनी स्कर्टमध्ये फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा

हे देखील वाचा