नव्या वर्षाच्या पहिल्या वीस दिवसांतच मराठी सिनेसृष्टीतील चौथं लग्न, ‘या’ अभिनेत्रीने बांधली लगीनगाठ


सध्या हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे.  नविन वर्ष काय सुरु झाले मराठी कलाकारांनी लग्नाचा जसा धडाका सुरु केला आहे. एकापाठोपाठ एक असे तीन लग्न मागच्या वीस दिवसात झाले आहे. अजून अनेक मराठी कलाकार ह्यावर्षी लगीनगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. मागीलवर्षी कोरोना महामारीमुळे अनेक कलाकारांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले होते.

२०२० वर्ष संपत असताना कोरोनाचा भारतातील प्रभावही कमी झाला आहे तसेच नविन वर्षात कोरोनावर लस देखील आली. त्यामुळे आता कलाकारांनी बेधडकपणे त्यांचे लग्न करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अभिज्ञा भावे, मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी हे कलाकार विवाहबंधनात अडकले आहे. या यादीत आता अभिनेत्री प्राजक्ता परब हिची देखील भर पडत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता परबहीने अंकुश मरोदेसोबत लगीनगाठ बांधली आहे. तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या दोघांचे लग्न ९ जानेवारी २०२१ ला पार पडले.

प्राजक्ताने तिच्या मेहेंदी आणि हळदी या दोन्ही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. प्राजक्तच्या या फोटोना तिच्या फॅन्सकडून आणि कलाकारांकडून भरभरून लाईक्स आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा येत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता परबने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ललित २०५ या मालिकेत काम केले आहे. तसेच माझ्या मित्राची गर्लफ्रेंड वेबसीरिजमध्येदेखील ती झळकली आहे. तर अंकुश मरोदे हा लेखक आणि दिग्दर्शक आहे.

आता लवकरच मराठी इंडस्ट्रीतील सर्वात क्युट आणि सुंदर जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर देखील लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.