Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

मनमोहक हास्य अलौकिक रुपाने भावूक झाले लोक; असं दिसतंय प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामांचं रूप

आज 22 जानेवारीला आयोध्येत राममंदीर प्राणप्रतिष्टेचा(ram mandir pran pratishta) कार्यक्रम पार पडत आहे. प्राणप्रतिष्ठेचा शूभ मुहुर्त दुपारी 12 वाजुन 29 मिनिट आणि 8 सेकंदांपासुन ते 12 वाजुन 30 मिनिटे आणि 32 सेकंदांपर्यंतचा होता. या प्राणप्रतिष्टेसाठी फक्त 84 सेकंदाचा वेळ होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) हे ऐतिहासिक कार्य पुर्ण केले आहे. मोदींचे दर्शन झाल्यावर इतर रामभक्त दर्शन घ्यायला सुरुवात करणार होते.त्यामुळे आता आमंत्रित पाहुण्यांनी रामल्लांच्या दर्शनाला सुरुवात केलेली आहे. 23 जानेवारीपासुन सर्वसामान्य लोकांसाठी प्रभू श्रीरामांचे दरवाजे खुले केले जाणार आहेत.

रामलल्लाच्या दर्शनाची शतकांची प्रतिक्षा अखेर आज संपली. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाची पहिली प्रतिमा पाहुन अनेक राम भक्तांचे अश्रु अनावर झाले होते. प्रभू श्री रामांची ही मुर्ती 3 अब्ज वर्षांपुर्वीच्या एका शिल्पापासुन बनवली गेली असल्याचे म्हणले जात आहे. अरुण योगीराज यांनी ही मुर्ती घडवली आहे. रामलल्लाच्या मुकुटात नऊ रत्न सुशोभित केले असुन गळ्यातही सुंदर रत्नांची माळ आहे. प्रभू श्रीरामांचा(prabhu shri ram ) कमरपट्टाही सोन्यापासुन बनलेला आहे. रामलल्लाच्या आभुषणांमध्ये हीरे,विविध रत्न आणि मोत्यांचा समावेश आहे.

रामलल्लाची ही मुर्ती ‘बालकांड रामचरितमानस’मध्ये जसं रामलल्लाचं वर्णन केलेलं आहे अगदी तशीच बनवली गेली आहे,आणि तिला सुशोभितंही त्या वर्णनानुसारंच केलेलं आहे. त्यांच्या चरणी वज्र, ध्वज आणि अंकुश ही प्रतीके विभूषित केली आहेत. कमरेवर कमरपट्टा आणि पोटावर त्रिवली आहे.रामल्लाचे विशाल हात दागिन्यांनी सजलेले आहेत. त्याचबरोबर छातीवर वाघाच्या पंजाची अनोखी अशी छटा आहे. त्यासोबतंच रत्नांनी बनलेल्या मण्याच्या हार देखील छातीवर सुशोभित केला गेला आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर हे रुप जेव्हा सर्वांसमोर आले तेव्हा हे रूप पाहुन अनेक भक्त भावुक झाले.

आज अनेक महान हस्तींनी राममंदीराच्या उद्घाटनासाठी आयोध्येत हजेरी लावली आहे. या्ध्येअ अमिताभ बच्चन(amitabh bachchan ) ,कतरिना कैफ-विकी कौशल(vicky-katrina), आलिया भट्ट-रणबीर कपूर(ranbir -alia), जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित यांसारखे कलाकारही सामील झाले आहेत. त्यासोबतच बडे उद्योगपती,राजकारणी, कलाकार, धर्मगुरू यासारख्या जवळपास 7000 पेक्षाही जास्त व्यक्तींनी काल आणि आज आयोध्येला भेट दिली आहे.

हे देखील वाचा